• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? ही 5 नावं चर्चेत, आज होणार निर्णय

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? ही 5 नावं चर्चेत, आज होणार निर्णय

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या (Gujarat New CM) खुर्चीवर कोण बसणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजप (BJP) रविवारी (आज) विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार आहे.

 • Share this:
  अहमदाबाद 12 सप्टेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिला (Vijay Rupani Resigns). गुजरातमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत आणि असं मानलं जात की भाजपला विजय रुपाणींवर दाव लावायचा नाही. कोरोना काळात गुजरात सरकारचे अपयश हे देखील राजीनाम्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या (Gujarat New CM) खुर्चीवर कोण बसणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजप (BJP) रविवारी (आज) विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार आहे. गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत ज्या नावांची चर्चा होत आहे त्यात मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल यांची नावं समाविष्ट आहेत. मनसुख मांडविया मनसुख मांडविया यांना अलीकडेच मोदी सरकारमध्ये आरोग्यमंत्री बनवण्यात आलं आहे. हर्षवर्धन यांच्या जागी त्यांना आरोग्य मंत्री करण्यात आलं आहे. मनसुख मांडविया वर्ष 2012 मध्ये पहिल्यांदा गुजरातमधून राज्यसभेत पोहोचले आणि 2018 मध्ये पुन्हा सदस्य झाले. यापूर्वी ते 2002 ते 2007 पर्यंत गुजरात विधानसभेचे सदस्य होते. ते मोदींचे जवळचे आणि विश्वासू मानले जातात. BREAKING : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा तडकाफडकी राजीनामा पुरुषोत्तम रूपाला पुरुषोत्तम रुपाला 1991 मध्ये अमरेलीतून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर तिथून पुढे तीन वेळा आमदार राहिले. 2016 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले. 2019 मध्ये त्यांना कृषी आणि कल्याण मंत्री करण्यात आले. अलीकडेच त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीआर पाटील सीआर पाटील हे पंतप्रधान मोदींचे खूप जवळचे मानले जातात. वर्ष २०२० मध्ये त्यांना गुजरात भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले. 65 वर्षीय पाटील हे त्यांच्या मतदारसंघात तंत्रज्ञान आणि विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. पाटील यांनी वाराणसीमध्ये पंतप्रधान निवडीची जबाबदारीही बजावली आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामागे 'निवडणुका' आहे कारण? चर्चेला उधाण उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत समावेश आहे. नितीन पटेल हे गुजरातमधील ज्येष्ठ पटेल नेते म्हणून ओळखले जातात. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नितीन पटेलही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते, पण त्यावेळी भाजपने राज्याची कमान विजय रुपाणी यांच्याकडे सोपवली. लक्षद्वीपचे उपराज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल या सर्वांसोबतच नवीन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आणखी एक नाव आहे ते म्हणजे लक्षद्वीपचे उपराज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल. त्यांला अहमदाबाद गाठण्याचे फर्मानही जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांत राजीनामा देणारे रुपाणी हे चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी उत्तराखंडमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री बदलले गेले, प्रथम त्रिवेंद्रसिंह रावत आणि नंतर तीरथ सिंह रावत यांना काढून टाकण्यात आले आणि पुष्करसिंग धामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची कमान दिली. येडियुरप्पा यांची जुलै महिन्यात कर्नाटकात बदली झाली. रविवारी गुजरातमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: