मराठी बातम्या /बातम्या /देश /

Who is Saket Gokhle : खोट्या ट्विटमुळे अटक झालेले साकेत गोखले कोण आहेत?

Who is Saket Gokhle : खोट्या ट्विटमुळे अटक झालेले साकेत गोखले कोण आहेत?

तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेते राहुल गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेते राहुल गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेते राहुल गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 डिसेंबर :  तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना एका वादग्रस्त ट्विटवरून गुजरात पोलिसांनी मंगळवारी (6 डिसेंबर) जयपूरमधून अटक केली. मोरबी पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्याशी संबंधित एका खोट्या बातमीचा या ट्विटमधून प्रसार करण्यात आला होता.

आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदींच्या मोरबी भेटीवर 30 कोटी रुपये खर्च झाला आहे, असा दावा करणारं ट्विट गोखले यांनी केलं होतं; मात्र आरटीआयअंतर्गत अशी माहिती देण्यात आली नसल्याचं पीआयबी-फॅक्ट चेकने स्पष्ट केलं. साकेत गोखले यांना अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 'नवभारत टाइम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कोण आहेत साकेत गोखले?

साकेत गोखले हे तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. पारदर्शकता तपासणारी व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते स्वत:चा उल्लेख करतात. ते एक आरटीआय कार्यकर्ता असून त्यांनी आतापर्यंत पेगासस स्पायवेअर, बँक लोन आणि तुकडे-तुकडे गँग यांसह विविध प्रकरणांमध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केले आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेते राहुल गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

साकेत गोखले यांनी एक डिसेंबर रोजी ट्विटरवर एक बातमी शेअर केली होती. त्यात दावा करण्यात आला आहे, की 'ऑक्टोबरमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मोरबी दौऱ्यावर गुजरात सरकारनं 30 कोटी रुपये खर्च केल्याचं माहितीच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरातून उघड झालं आहे.' 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेत 135 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

पीआयबी फॅक्ट चेक या सरकारी संस्थेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे . अशा कोणत्याही आरटीआय अर्जाला उत्तर दिलेलं नाही, असा प्रतिदावा पीआयबीनं केला आहे. साकेत गोखले यांनी पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने मोरबी घटनेवर दिशाभूल करणारं ट्विट केल्याचा आरोप आहे. गोखले यांच्या या ट्विटनंतर भाजप नेते अमित कोठारी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

सायबर क्राइम विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी), जितेंद्र यादव यांनी सांगितलं की, गोखले यांना पहाटे राजस्थानची राजधानी जयपूरमधून अहमदाबाद सायबर क्राइम सेलच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. एका नागरिकाकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल गोखले यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. गोखले यांना अटक करून अहमदाबादला आणण्यात आलं. तिथे न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीसी कलम 465, 469, 471 आणि 501 (बदनामी करणारी माहिती प्रकाशित केल्यासंबंधी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा; असा असतो त्यांचा संपूर्ण दिनक्रम

राम मंदिरालाही विरोध

दोन वर्षांपूर्वी साकेत गोखले यांनी रामजन्मभूमी मंदिराचा पायाभरणी सोहळा रोखण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनलॉक 2.0 ची मार्गदर्शक तत्त्वं आणि कोरोनाच्या काळात जनतेचं आरोग्य लक्षात घेऊन अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याच्या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी गोखले यांनी केली होती. तेव्हा ते चर्चेत आले होते. त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.

साकेत गोखले यांच्यावरची कारवाई म्हणजे सूडाचं राजकारण आहे, असं टीएमसीने म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दाव्यानुसार, 'गोखले यांनी कोणतीही चूक केलेली नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. साकेत अतिशय चांगले व्यक्ती आहेत. सोशल मीडियावर ते खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. मी या सूडबुद्धीच्या वृत्तीचा निषेध करते. त्यांना अटक करण्यात आली, कारण त्यांनी पंतप्रधानांबद्दल ट्विट केलं होतं. लोक माझ्या विरोधातही ट्विट करतात... या परिस्थितीबद्दल आम्ही नाराज आहोत.'

'भारत जोडो'चा गुजरातमध्ये काँग्रेसला फायदा होणार का? काय सांगतात एग्झिट पोल

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले, की "तृणमूल काँग्रेस अशा धमकावण्याच्या कृत्यांनी खचून जाणार नाही. निडर असलेले गोखले अशा सरकारच्या विरोधात उभे राहिले जे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचे जीवन पणाला लावतं. प्रत्युत्तरादाखल घाबरलेल्या भाजपनं गोखले यांना गुजरात पोलिसांकरवी अटक केली. या धमकावण्यामुळे टीमएसी नतमस्तक होईल, असा विचार करणे हा त्यांचा मूर्खपणा आहे."

First published:

Tags: Fake news, Gujrat, PM Naredra Modi, TMC