जाहिरात
मराठी बातम्या / देश / Gujarat Exit Poll Results : 'भारत जोडो'चा गुजरातमध्ये काँग्रेसला फायदा होणार का? काय सांगतात एग्झिट पोल

Gujarat Exit Poll Results : 'भारत जोडो'चा गुजरातमध्ये काँग्रेसला फायदा होणार का? काय सांगतात एग्झिट पोल

Gujarat Exit Poll Results : 'भारत जोडो'चा गुजरातमध्ये काँग्रेसला फायदा होणार का? काय सांगतात एग्झिट पोल

Gujarat Exit Poll Results : एग्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा भाजपला असून गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 05 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवड़णुकीसाठी मतदान आज पार पडलं. उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आता एग्झिट पोल समोर येत असून यामध्ये भाजपला मोठा विजय मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजपने गुजरातचा गड राखण्यासाठी मोठी ताकद लावली. तर दुसरीकडे गुजरात, हिमाचल प्रदेश या दोन राज्यात निवडणुका असताना काँग्रेसने त्यांचे लक्ष भारत जोडो यात्रेवर लावले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दोनच दिवस गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फारसा फायदा होत नसल्याचं चित्र दिसतंय.

News18

एग्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा भाजपला असून गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेसच्या जागा कमी होतील असं एग्झिट पोलमध्ये दिसतंय.   गुजरात विधानसभा निवडणुकीचे एग्झिट पोल सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

News18

आपने आम्हीच जिंकू असा दावा केला असला तरी त्यांना 2 ते 10 जागा मिळतील असं एग्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

News18

भाजपला 117 ते 140 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला मात्र 34 ते 51 इतक्याच जागा जिंकता येतील असं एग्झिट पोलमध्ये दिसतंय. तर आपला गुजरातमध्ये 3 ते 10 जागा मिळतील असं या एग्झिट पोलमध्ये चित्र दिसून येत आहे. याशिवाय इतर 3 ते 7 जागा जिंकतील असा अंदाज एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा :  गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत? एग्झिट पोलमधून धक्कादायक निकाल

News18

गुजरातमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या होत्या. त्यांना 2012 पेक्षा 16 जागा कमी मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने 2012 च्या तुलनेत2017 मध्ये 16 जागा जास्त जिंकत 77 जागी विजय मिळवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात