मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतीय पारंपरिक औषधांचा जगात डंका; WHO च्या सहकार्याने उभारलं जाणार Global center

भारतीय पारंपरिक औषधांचा जगात डंका; WHO च्या सहकार्याने उभारलं जाणार Global center

या औषध केंद्राच्या उभारणीसाठी भारत सरकार आणि WHO यांनी सामंजस्य करार केला आहे. हे जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये बांधलं जाणार आहे. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं की, हे WHO चं जगातील पारंपारिक औषधांचं एकमेव जागतिक केंद्र असेल.

या औषध केंद्राच्या उभारणीसाठी भारत सरकार आणि WHO यांनी सामंजस्य करार केला आहे. हे जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये बांधलं जाणार आहे. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं की, हे WHO चं जगातील पारंपारिक औषधांचं एकमेव जागतिक केंद्र असेल.

या औषध केंद्राच्या उभारणीसाठी भारत सरकार आणि WHO यांनी सामंजस्य करार केला आहे. हे जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये बांधलं जाणार आहे. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं की, हे WHO चं जगातील पारंपारिक औषधांचं एकमेव जागतिक केंद्र असेल.

पुढे वाचा ...

नई दिल्ली, 26 मार्च ः भारताचं पारंपारिक औषध शास्त्र (Indian Traditional Medicine) आणि औषधांविषयी जगभर प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जगातील लोकांना याबद्दल कुतूहल आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) देखील मान्य केलंय की जगातील इतर देशांनाही याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं WHO आणि भारत सरकारनं WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची (Global Center for Traditional Medicine) स्थापना करण्यासाठी करार केला आहे. पारंपारिक औषधांसाठी हे जागतिक ज्ञान केंद्र भारत सरकारच्या मदतीनं बांधलं जाईल. यासाठी भारत 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील पारंपारिक औषधांची क्षमता पुढे नेणं हा या केंद्राचा उद्देश आहे.

या औषध केंद्राच्या उभारणीसाठी भारत सरकार आणि WHO यांनी सामंजस्य करार केला आहे. हे जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये बांधलं जाणार आहे. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं की, हे WHO चं जगातील पारंपारिक औषधांचं एकमेव जागतिक केंद्र असेल. आपल्या देशाला पारंपारिक औषधांमध्ये आपली ताकद सिद्ध करून दाखवण्याची ही संधी असेल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले - स्तुत्य उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करून याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भारताचे पारंपारिक औषध आणि उत्तम आरोग्याच्या पद्धती जगभरात लोकप्रिय होत आहेत. ते म्हणाले की, हे WHO केंद्र आपल्या समाजात आरोग्य वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरेल. 'गुजरातमधील जामनगर येथे WHO-GCTM च्या स्थापनेसाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात झालेला करार हा एक स्तुत्य उपक्रम आहे,' असं ते पुढे म्हणाले.

हे वाचा - हजारो कोटी लुबाडणारा कुख्यात भामटा पोलिसांच्या जाळ्यात, बनला होता कांदा व्यापारी

पारंपारिक औषधांचा वापर

जगातील सुमारे 80% लोक पारंपारिक औषधांचा वापर करतात. आतापर्यंत, 194 पैकी 170 WHO सदस्य देशांनी पारंपारिक औषधांचा वापर केल्याचं नोंदवलं आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस म्हणाले, 'जगभरातील लाखो लोक कोणत्याही आजारावर किंवा आजारांच्या सुरुवातीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी पारंपारिक औषधंच सर्वांत पहिल्यांदा वापरतात. सर्व लोकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी उपचारांसाठी प्रवेश हा WHO च्या मिशनचा एक आवश्यक भाग आहे आणि हे नवीन केंद्र पारंपारिक औषधांसाठी पुरावा आधार मजबूत करण्यासाठी विज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास मदत करेल. भारत सरकारच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आम्ही ते यशस्वी करण्यासाठी उत्सुक आहोत.

हे वाचा - योगींच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा; भाजपनं असं जुळवून आणलंय जातीचं गणित

नैसर्गिक घटकांपासून 40% फार्मास्युटिकल उत्पादने

आज वापरात असलेली सुमारे 40% औषधी उत्पादने नैसर्गिक पदार्थांपासून बनलेली आहेत. उदाहरणार्थ, अ‌ॅस्पिरिनचा शोध विलोच्या झाडाची साल वापरून पारंपारिक औषधांच्या फॉर्म्युलेशनवर आधारित होता. गर्भनिरोधक गोळी जंगली याम वनस्पतींच्या मुळांपासून विकसित करण्यात आली होती आणि लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार गुलाबी पेरीविंकलवर आधारित होते. मलेरिया नियंत्रणासाठी आर्टेमिसिनिनवरील नोबेल पारितोषिक विजेतं संशोधन प्राचीन चिनी वैद्यकीय ग्रंथांच्या पुनरावलोकनानं सुरू झालं.

First published:

Tags: Ayurvedic medicine, Pm modi, Who