लखनऊ, 25 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दणदणीत विजयानंतर आता योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची (Uttar Pradesh CM) शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार्या दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या चेहऱ्यांपैकी सर्वात आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे दानिश आझाद अन्सारी. यूपी मंत्रिमंडळात एकमेव मुस्लिम चेहरा बनलेले दानिश हे योगी सरकारमधील नवीन चेहरा आहेत, तर माजी मंत्री मोहसिन रझा यांना डच्चू मिळाला आहे. नवभारत टाईम्स ने दिलेल्या बातमीनुसार, योगी 2.0 सरकारमध्ये 52 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिले नाही. मात्र, बलिया जिल्ह्यातील बसंतपूर गावचे रहिवासी असलेले दानिश आझाद अन्सारी यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, मागील योगी सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री, मुस्लीम वक्फ आणि हज मंत्री मोहसिन रझा यांचा पत्ता यावेळी कट करण्यात आला आहे. दानिश गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित आहेत. योगी सरकार आल्यावर त्यांना भाषा समितीचे सदस्य करण्यात आले होते. गेल्या वर्षी भाजपने त्यांना जबाबदारी दिली आणि भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस बनवले. अल्पसंख्याक समाजात ते सतत सक्रिय होते, ज्याचे त्यांना योगी सरकारमध्ये मंत्री करून बक्षीस मिळाले आहे. ते यूपी सरकारच्या फखरुद्दीन अली मेमोरियल कमिटीचे सदस्यही आहेत. हे वाचा - मंदिरातून देवालाच घेऊन गेले कोर्टात; पण त्यालाही मिळाली पुढची तारीख, अजब खटला दानिश यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून केले. त्यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून बीए केले. कॉमचा अभ्यास केला. येथून त्यांनी लोक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थी राजकारणाच्या काळापासून दानिश अभाविपसोबत सक्रिय होते. 2017 मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा दानिश यांना त्यांच्या सक्रियतेचे बक्षीस मिळाले होते. हे वाचा - अभ्यासाला जाते म्हणाली अन् OYO रूममध्ये गेली; बीटेक विद्यार्थिनीचा भयावह शेवट यावेळीही योगी सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत, मात्र यावेळी एक चेहरा वेगळा आहे. दिनेश शर्मा यांच्या जागी लखनौ कॅन्टचे आमदार ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर निवडणुकीत पराभूत होऊनही केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्री होणार आहेत. योगींनी शुक्रवारी सकाळी आपल्या भावी मंत्र्यांना शपथविधीपूर्वी चहासाठी बोलावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.