जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनानंतर जगातील दुर्मिळ आजाराची लागण; खोकल्याची ढास लागली तर 200 ते 300 मिली जातं रक्त

कोरोनानंतर जगातील दुर्मिळ आजाराची लागण; खोकल्याची ढास लागली तर 200 ते 300 मिली जातं रक्त

कोरोनानंतर जगातील दुर्मिळ आजाराची लागण; खोकल्याची ढास लागली तर 200 ते 300 मिली जातं रक्त

या आजारात खोकल्याची ढास लागली की, २०० ते ३०० मिलिलिटर रक्त जातं. हा जगातील दुसरा रुग्ण असल्याचा दावा केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 21 ऑगस्ट : कोरोनातून (CoronaVirus) बरे झाल्यानंतरही खोकला सुरूच होता. त्यानंतर मात्र खोकल्यातून रक्त पडू लागलं. यानंतर मात्र घरातील नातेवाईक घाबरले होते. त्यांनी रुग्णावर मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील शेवाळे यांच्याशी संपर्क केला. यावेळी डॉक्टरांनी पल्मोनरी सुडोअॅन्युरिझम (रक्तवाहिनीतील फुगवटा) (Pulmonary pseudoanurism) या दुर्मिळ आजाराचे निदान केलं. यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. अक्कलकोटमधील एका 56 व्यक्तीचं या आजारातून जीव वाचला आहे. त्यांचं हिमोग्लोबिन आणि ब्लड प्रेशर कमी झालं होतं. सुरुवातील रक्तस्त्रावाचं कारण शोधण्यासाठी रुग्णाचं सीटी स्कॅन आणि पल्मोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. यावेळी रुग्णाला पल्मोनरी सुडोअॅन्युरिझम नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झालं. रुग्णाच्या फुप्फुसात रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या खोकल्याद्वारे रक्त बाहेर पडत होतं. डॉ. सुनील शेवाळे यांनी रक्तवाहिनीमध्ये कॅथेटरद्वारे प्लॅटिनम कॉइल व पॉलिविनाइल अल्कोहोलचा वापर करून रक्तवाहिनीतील फुगवटा दूर केला. यातून रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. हे ही वाचा- Delta च्या संकटात Oxford ने वाढवलं टेन्शन; कोरोना लशीबाबत धक्कादायक रिपोर्ट अशा प्रकारच्या केसेस क्वचितच क्षयरुग्णांमध्ये आढळतात. मात्र या रुग्णाला क्षयरुग्णाची पार्श्वभूमी नसताना या आजाराची लागण झाली होती. या रुग्णाला एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोविडमुळे या विकाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कोविडनंतर हा भयावर विकार उद्भवल्याची ही जगातील दुसरी आणि भारतातील पहिली घटना असू शकते, असे डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. सत्यश्याम तोष्णीवाल, डॉ. राहुल सोमाणी, डॉ. अमोलकुमार अचलेरकर, डॉ. विशाल गोरे, डाॅ. पंकज नंदा व कॅथलॅब टीमच्या प्रयत्नामुळे या रुग्णाचा जीव वाचला. काय आहे पल्मोनरी सुडोअॅन्युरिझम हा आजार? हा एक जीवघेणा आजार आहे. यात रक्तवाहिनीच्या तीन आवरणांपैकी दोन आवरणे निकामी होतात. त्यामुळे रक्तवाहिनीवर ताण येऊन ती फुगते. परिणामी रक्तदाबामुळे या फुगवठ्यावर ताण येऊन रक्तवाहिन्या फुटतात व खोकल्याद्वारे रक्तस्रावाचे प्रमाण वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात