Home /News /national /

भयंकर! बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तरुणाचा तडफडून मृत्यू

भयंकर! बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तरुणाचा तडफडून मृत्यू

Crime News: देवीला बकऱ्याचा बळी देत असताना एक तरुणाने थेट बोकड पकडणाऱ्या व्यक्तीची मान कापली (cut man's neck) आहे. हा वार इतका भयावह होता की, संबंधित व्यक्तीचा तडफडून मृत्यू (Death) झाला आहे.

    चित्तूर, 18 जानेवारी: देवीला बकऱ्याचा बळी देत असताना एक तरुणाने थेट बोकड पकडणाऱ्या व्यक्तीची मान कापली (cut man's neck) आहे. हा वार इतका भयावह होता की, संबंधित व्यक्तीचा तडफडून मृत्यू (Death) झाला आहे. दारूच्या नशेत आरोपीकडून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून त्याला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर (Chittur) येथे घडली आहे. सुरेश असं मृत पावलेल्या 35 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विवाहित आहे. मृत सुरेशला दोन मुलं देखील आहेत. तर चिलापथी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्तूर जिल्ह्यातील वलसापल्ले येथे यल्लमा देवीचं मंदिर आहे. या मंदिरात संक्रांतीनिमित्त जनावरांचा बळी दिला जातो. या मंदिरात आरोपी चिलापथी जनावरांचा बळी देण्याचं काम करत होता. हेही वाचा-एकटं राहणाऱ्या महिलेसोबत घडलं विपरीत, छातीत अन् डोक्यात गोळ्या घालून हत्या दरम्यान, मृत सुरेश याठिकाणी बळी देण्यासाठी एक बोकड घेऊन आले होते. ते बोकडाला बळी देण्यासाठी धरून उभे असताना, आरोपी चिलापथीने बोकडाऐवजी सुरेश यांच्या मानेवर वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता, ही सुरेश रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी कोसळले. यावेळी आजूबाजुच्या लोकांनी तातडीने सुरेश यांना मदनपल्ले येथील सरकारी रुग्णालयात दाखल दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याठिकाणी पोहोचताच, डॉक्टरांनी सुरेश यांना मृत घोषित केलं. हेही वाचा-सोबत मरताही नाही आलं, नियतीनं केलं कायमचं वेगळं, बीडमधील कपलसोबत घडलं आक्रीत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी चिलापथीला अटक केली आहे. आरोपी दारुच्या नशेत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपीचा मृताशी काही जुना वाद होता का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मंदिराच्या आवारातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Andhra pradesh, Crime news, Murder

    पुढील बातम्या