मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमी युगुलानं उचललं टोकाचं पाऊल; कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमी युगुलानं उचललं टोकाचं पाऊल; कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

(File Photo)

(File Photo)

Suicide in Chandrapur: एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं एका प्रेमी युगुलानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

  • Published by:  News18 Desk

चंद्रपूर, 31 जुलै: एकमेकांवर जीवापाड प्रेम (Love) असूनही घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं (Family refused to love marriage) एका प्रेमी युगुलानं (Couple) टोकाचं पाऊल उचललं आहे. जोडप्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर लगतच्या जंगलात जाऊन गळफास घेत आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे. आत्महत्या केल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

राजू आत्राम आणि सलोनी मडावी असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचं नाव आहे. दोघंही गडचिरोली जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रामणगट्टा येथील रहिवासी आहेत. कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असल्यानं दोघांनी अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केला आहे. प्रेमी युगुलांनी दहा दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या केळझर लगतच्या जंगलात येऊन आत्महत्या केली होती. संबंधित प्रेयसीनं आपली दुचाकी रस्त्याच्या कडेलाच लावली होती.

हेही वाचा-नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या

दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेऊन तपास केला असता, मूळ मालकानं ही दुचाकी मृत पीडितेच्या घरच्यांना विकल्याचं लक्षात आलं होतं. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, वनरक्षक महादेव मोरे आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगल परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांना मुख्य रस्त्यापासून आर्धा किमी आतमध्ये जंगलात एका तरुणाचा आणि तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन मूल याठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवले.

हेही वाचा- वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार

बेवारस दुचाकीवरून तपास करत पोलिसांनी मृत प्रेमी युगुलाची ओळख पटवली आहे. मयत दोघं राजू होमदेव आत्राम आणि सलोनी रामकृष्ण मडावी (वय-18) असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. राजू आणि सलोनी याचं दोघांवर जीवापाड प्रेम होतं. पण घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Chandrapur, Love, Suicide