Home /News /crime /

मित्रांना वैतागून उचललं धक्कादायक पाऊल; हायवेशेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुण

मित्रांना वैतागून उचललं धक्कादायक पाऊल; हायवेशेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुण

धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने याबाबत फेसबुक लाइव्ह केलं. यामध्ये त्याने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.

    भोपाळ, 31 जुलै : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरोली येथील एका तरुणाने शहडोलच्या सोहागपुरमध्ये झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचं त्याने फेसबुक लाइव्हपणं केलं होतं. सोशल मीडियावरच त्याने सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने पत्नीकडून केली जाणारी फसवणूक आणि मित्रांच्या कृत्यामुळे त्रस्त असल्याचा उल्लेख केला आहे. त्याने आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या सोहागपूर पोलीस सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Young man commits suicide) सिंगरोली येथे राहणारा नीरज गुप्ता (35) याने सोहागपूर हायवेच्या किनाऱ्यावरील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी नीरजने फेसबुकवर सुसाइड नोट लिहिली होती. यानंतर गळफास घेऊन फेसबुक लाइव्ह करीत त्याने आत्महत्या केली. हे ही वाचा-मच्छिमारानं रात्री पाण्यात टाकलं जाळं; सकाळी जाळ्यात माशाऐवजी आढळला आईचा मृतदेह मृत्यूपूर्वी नीरजने पत्नी शालिनी गुप्तावर आरोप लावला आहे. त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिलं आहे की, संजय नामदेव आणि शिवकली साकेत यांच्यासोबत मिळून शालिनी गुप्ताने माझ्या पहिल्या मुलाची हत्या केली होती. मी यावेळी विरोध केला, त्यावेळी खोट्या केसमध्ये तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली होती. संजय आणि शवकली यांनी एक वर्षांपूर्वी शालिनीचं लग्न नीरजसोबत लावून दिलं होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत चांगली मैत्री झाली होती. मात्र काही दिवसात हे चित्र बदललं. मित्रांच्या इशाराने घरात सर्व गोष्टी चालत होत्या. इतकच नाही तर नीरजला पत्नीला भेटूही देत नव्हते. संजय सिंगरोली कम्युनिस्ट पार्टीचा नेता आहे. या प्रकरणात शहराच्या एएसपी यांनी सांगितलं की, सोहागपूर हायवेवर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गळफास लावल्याचं वृत्त सांगितलं जात आहे. कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आलं आहे. मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Friendship, Madhya pradesh, Marriage, Suicide

    पुढील बातम्या