Home /News /national /

खेळता खेळता उकळतं पाणी पडलं अंगावर; उपचाराशिवाय 3 दिवस घरातच तडफडत राहिली 2 वर्षांची स्वास्ती

खेळता खेळता उकळतं पाणी पडलं अंगावर; उपचाराशिवाय 3 दिवस घरातच तडफडत राहिली 2 वर्षांची स्वास्ती

मुलीच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात न नेण्यामागे धक्कादायक कारण सांगितलं.

    जयपूर, 23 जानेवारी : नागरिकांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाची (Coronavirus) भीती वाढत आहे. इतकी की लोक रुग्णालयात जाण्यासाठी घाबरत आहेत. उकळत्या पाण्यात 20 टक्के जळालेल्या 2 वर्षांच्या मुलीसोबत अशीच घटना घडली. या मुलीवर तिचे आई-बाबा घरीच उपचार करीत होते. कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने ते तिच्यावर घरीच उपचार करीत होते. ती 3 दिवसांपर्यंत घरातच वेदनेने तडफडत राहिली. तेथेच लोक प्रतिनिधींना याबाबत कळताच ते मुलीला रुग्णालयात घेऊन गेले. कालुलाल बैरवा यांची मुलगी स्वास्ती हिच्यावर तीन दिवसांपूर्वी उकळतं पाणी पडलं. कालुरामने सांगितलं की, घरात चुलीजवळ पाणी गरम करायला ठेवलं होतं. यादरम्यान त्यांची मुलगी खेळत खेळत चुलीजवळ गेली आणि उकळतं पाणी स्वास्तीच्या अंगावर पडलं. या अपघातात स्वास्तीचे हात, पोट आणि पाय भाजले. शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आम्ही मुलीला रुग्णालयात नेलं नाही. तर घरीच तिच्यावर उपचार केला. हे ही वाचा-पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने भडकला पती; युवकाच्या डोळ्यात खुपसलं हत्यार अन्... गॅस सिलेंडर सप्लाय करणाऱ्या तरुणाने पाहिलं.. शनिवारी त्यांच्या घरी गॅस सिलेंडरचा सप्लाय करण्यासाठी आलेल्या बजरंग घाकड याने मुलीला विव्हळताना पाहिलं. बजरंगने याबाबत आपल्या एजन्सीचा मालक आणि नगरसेव राजेश सोलंकी यांना माहिती दिली. यानंतर सोलंकी तत्काळ त्यांच्या घरी आले व मुलीला रुग्णालयात हलवण्यात आले. मुलगी तब्बल 20 टक्के भाजली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Baby hospitalised, Rajasthan

    पुढील बातम्या