नवी दिल्ली 23 जानेवारी : राजधानी दिल्लीतून एक अतिशय अजब घटना (Delhi Crime News) समोर आली आहे. या घटनेत पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने दिल्लीतील एका व्यक्तीने 30 वर्षीय युवकाच्या डोळ्यात टोकदार हत्याराने वार करून त्याला जखमी केलं. हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की पत्नीसोबत केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे तो भडकला आणि रागात त्याने हे पाऊल उचललं (Man Misbehaving with Woman). पोलीस सध्या या घटनेची चौकशी करत आहे.
धक्कादायक! आधी हत्या, मग भाजीसोबत शिजवून खाल्लं शेतकऱ्याचं हृदय अन् जीभ
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या टीमने सांगितलं, की ही घटना पश्चिम दिल्लीच्या टॅगोर गार्डन परिसरात घडली आहे. यात आपल्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा राग आल्याने रागात एका व्यक्तीने कथित आरोपी बबलू याच्या डोळ्यात बर्फ तोडण्यासाठी वापरलं जाणारं टोकदार हत्यारं खुपसलं. यात बबलू गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात निलोठी येथील दोन आरोपी अनुज आणि एका अल्पवयीन मुलाला तेथील लोकांनी पकडलं आणि मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. यादरम्यान संधीचा फायदा घेत एक इतर आरोपी तिथून फरार झाला. फरार आरोपी 30 वर्षाचा असून त्याचं नाव सोहन ठाकुर असं आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं, की चौकशीत असं समोर आलं आहे, की पीडित व्यक्तीने आरोपीच्या पत्नीसोबत गैरवर्तन केलं होतं. याच कारणामुळे ही घटना घडली. पोलिसांनी सांगितलं की हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी FIR दाखल करून घेण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. तर एक आरोपी फरार असून सध्या त्याचा शोध घेतला जात आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.