Home /News /national /

PM Cares फंडातील पैशांचा वापर कुठे केला? विरोधकांच्या आरोपावर सरकारचं प्रत्युत्तर

PM Cares फंडातील पैशांचा वापर कुठे केला? विरोधकांच्या आरोपावर सरकारचं प्रत्युत्तर

पीएम केअर्स फंडवर (PM Cares Fund) विरोधी पक्षातले नेते नेहमीच कोणत्या तरी कारणाने टीका करताना दिसून येतात

    नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : पीएम केअर्स फंडवर (PM Cares Fund) विरोधी पक्षातले नेते नेहमीच कोणत्या तरी कारणाने टीका करताना दिसून येतात; मात्र आज (7 ऑक्टोबर) याच फंडमधल्या निधीचा वापर करून विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स (Oxygen Production plants) उभारले जात असताना, हे विरोधक कुठेही दिसत नाहीयेत. उलट पंतप्रधानांनी घोषणा करण्याच्या एक दिवस अगोदरच हे विरोधक या ऑक्सिजन प्लांट्सचं उद्घाटन करताना दिसून आले. दिल्ली आणि झारखंड सरकारमधल्या नेत्यांनी बुधवारीच (6 ऑक्टोबर) कित्येक ऑक्सिजन प्लांट्सचं (Oxygen Plants inauguration in Delhi and Jharkhand) उद्घाटन केलं होतं; मात्र हे ऑक्सिजन प्लांट्स पीएम केअर्स फंडातल्या निधीचा वापर करून उभारण्यात आले आहेत, याबाबत त्यांनी सपशेल मौन बाळगलं. अशा प्रकारे एकीकडे पीएम केअर्स फंडवर टीका (Targets PM Cares) करायची आणि दुसरीकडे त्यातूनच उभारलेल्या विकासकामांचं श्रेय लाटायचं, असं कित्येक विरोधक करताना दिसून आल्याचं एका सरकारी सूत्राने म्हटलं आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास, दिल्ली सरकारमधल्या कित्येक नेत्यांनी सहा ऑक्टोबरला एकूण 27 ऑक्सिजन प्लांट्सचं उद्घाटन केलं. यातले 14 ऑक्सिजन प्लांट्स पीएम केअर्स फंडातून उभारण्यात आले होते. इतर ऑक्सिजन प्लांट्ससाठी उद्योग संस्थांनी निधी उभारला होता. केंद्र सरकारमधल्या एका सूत्राने न्यूज18ला याबाबत माहिती दिली. एका सूत्राने म्हटलं, “दिल्ली सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्ये (Delhi govt oxygen plants) पीएम केअर्स फंडचा साधा उल्लेखही केला गेला नव्हता.” हे ही वाचा-शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे हल्ले', लखीमपुर प्रकरणावर राहुल गांधींची टीका दिल्ली भाजपचे सरचिटणीस कुलजीत सिंग चहल म्हणाले, “दिल्ली सरकारने बुधवारी उद्घाटन केलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सपैकी कित्येक प्लांट्स पीएम केअर्समधून उभारण्यात आले होते. या प्लांट्सचं श्रेय (Opposition tried to steal credit) लाटण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत होतं.” चहल यांनी यातल्या काही प्लांट्सचा व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. दुसरीकडे झारखंडमध्येही बुधवारी 27 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. हे प्लांट्सदेखील (Jharkhand Oxygen plants) पीएम केअर्स फंडातून उभारण्यात आले होते. राज्य सरकारने याबाबत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्येही याचा उल्लेख होता; मात्र देशव्यापी लोकार्पण कार्यक्रम होण्याच्या एक दिवस आधीच झारखंड सरकारने उद्घाटन उरकून घेतलं. यामुळे झारखंड भाजपने राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. दरम्यान, गुरुवारी (7 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 35 ऑक्सिजन प्लांट्सचं (PM Modi inaugurated oxygen production plants) लोकार्पण केलं. उत्तराखंडमधल्या एआयआयएमएस हृषीकेशमध्ये (AIIMS Hrishikesh) हा कार्यक्रम पार पडला. देशातल्या प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आता पीएम केअर्स फंडातून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पीएसए ऑक्सिजन प्लांट (PSA Oxygen Plant) कार्यान्वित करण्यात आला असल्याचं पंतप्रधान मोदींनी या वेळी स्पष्ट केलं.
    First published:

    Tags: Oxygen supply, Pm modi

    पुढील बातम्या