मराठी बातम्या /बातम्या /देश /

15 वर्षांखालील मुलांना Covid लस कधी दिली जाईल? केंद्र सरकारनं दिलं उत्तर

15 वर्षांखालील मुलांना Covid लस कधी दिली जाईल? केंद्र सरकारनं दिलं उत्तर

Covid-19 Vaccine: सध्या कोरोना व्हायसरचा (Corona virus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. अशातच सरकार लसीकरणावर मोठ्या वेगानं भर देत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 21 जानेवारी: सध्या कोरोना व्हायसरचा (Corona virus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. अशातच सरकार लसीकरणावर मोठ्या वेगानं भर देत आहे. लसीकरणाची मोहिम (Vaccination Campaign) अधिक तीव्रतेनं वाढवत आहे. त्यातच लहान मुलांचं लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. पण 15 वर्षांखालील लहान मुलांना कोविडची लस कधी दिली जाईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर आता केंद्र सरकारनं उत्तर दिलं आहे.

12-14 वर्षे वयोगटातील मुलांना अँटी-कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) देण्याबाबतचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे घेतला जाईल आणि यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं केंद्र सरकारनं गुरुवारी सांगितलं. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉलने साप्ताहिक पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, जर एखाद्याला कोरोना व्हायरसची (Corona Virus)लागण झाली असेल तर ते तीन महिन्यांनंतर दुसरा किंवा बूस्टर डोस घेऊ शकतात.

Maharashtra Corona : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना भयानक वाढतोय, आकडेवारी नेमकं काय सांगतेय?

यासोबतच ते म्हणाले की, वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे लसीकरण सुरू करण्यात आले असून ते अतिसंवेदनशील व्यक्तींचे संरक्षण करण्याच्या गृहीतकावर आधारित आहे. म्हणून जसजसे वैज्ञानिकांकडून पुरावे उपलब्ध होतील, तसतसे आम्ही राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमची (Covid Vaccination Program) व्याप्ती वाढवू.

आमचे उद्दिष्ट 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण करणं आहे आणि हा निर्णय वैज्ञानिक ज्ञान आणि लसीकरण कार्यक्रमासाठी सर्वांगीण दृष्टिकोनातून घेतला जाईल. या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं पॉल यांनी म्हटलं आहे.

कोविड संक्रमित बूस्टर डोस कधी घेऊ शकतात?

कोविड-19 ग्रस्त व्यक्ती सावधगिरीचा डोस कधी घेऊ शकते असे विचारले असता पॉल म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली असेल तर तो तीन महिन्यांनंतर दुसरा किंवा सावधगिरीचा डोस घेऊ शकतो. नॅशनल इम्युनायझेशन टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) सतत यावर लक्ष ठेवत आहे आणि काही बदल झाल्यास निर्णय घेतला जाईल, असं पॉल यांनी सांगितलं.

त्याचवेळी केंद्र सरकारने सांगितलं की, कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बेड्स गेल्यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी भरल्या होत्या. राष्ट्रीय राजधानीतील दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेदरम्यान संसर्ग दर आणि हॉस्पिटलायझेशनचे विश्लेषण सादर करताना, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, 1 एप्रिल ते 20 मे 2021 या काळात हॉस्पिटलमध्ये भरती खूप जास्त होती.

Covid-19 Cases in Child: शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक 

भूषण म्हणाले, सध्याच्या लाटेत संसर्गाचे प्रमाण वाढले असले तरी, तिसऱ्या लाटेत बेडची आवश्यकता असलेले रुग्ण आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी होते. पुढे त्यांनी सांगितलं की, दिल्लीत उपचाराधीन रुग्णांची संख्या 75000 ते 78000 आहे आणि त्यापैकी 2500 रुग्ण आहेत. फक्त 2600 रूग्णालयात दाखल आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus