मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Covid-19 Cases in Child: शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक

Covid-19 Cases in Child: शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक

Mumbai Schools To Reopen: शाळा उघडण्याच्या निर्णयावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंय त्यांनी संमतीपत्र द्यावं."

Mumbai Schools To Reopen: शाळा उघडण्याच्या निर्णयावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंय त्यांनी संमतीपत्र द्यावं."

Mumbai Schools To Reopen: शाळा उघडण्याच्या निर्णयावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंय त्यांनी संमतीपत्र द्यावं."

  मुंबई, 20 जानेवारी:  राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू (Maharashtra School Reopen) होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून (24 January 2022)शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली. पण मुंबईत मात्र पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थी शाळेत जाऊ शकणार नाहीत. मुंबईच्या महापौरांनी पालकांचं संमतीपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं.

  राज्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

  राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू (Maharashtra School Reopen) होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra School reopen from 24th January said Minister Varsha Gaikwad)

  औरंगाबादमध्ये शाळा बंदच

  राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला असला तरी औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.

  औरंगाबाद मध्ये पोसिटीव्हीटी रेट 35%असल्याने लगेच शाळा सुरू करता येणार नाहीत. wait n watch ची भूमिका असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे. पुढचे आठ दिवस परिस्थितीचं निरीक्षण करणार आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं जाणवलं तरच औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार, असं आयुक्तांनी सांगितलं.

  First published:

  Tags: Corona, Corona vaccine, Mumbai Mayor, Varsha gaikwad