मुंबई, 20 जानेवारी : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona) प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai Corona Update) शहरात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरत असल्याचं चित्र असताना राज्यातील इतर भागांमध्ये मात्र वेगळं चित्र बघायला मिळतंय. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढताना दिसतोय. यामध्ये पुणे (Pune), चंद्रपूर (Chandrapur), जळगाव (Jalgaon), यवतमाळ (Yavatmal), वाशिम (Washim), अकोला (Akola), वर्धा (Wardha) जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे (Pune Corona) जिल्ह्यात तर आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील ग्रामीण भागामध्येही कोरोना फोफावताना दिसतोय.
राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये कोरोना भयानक वाढतोय
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 563 नवे रुग्ण
चंद्रपूर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 563 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चंद्रपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो. पण कालच्या तुलनेने आजच्या आकडेवारीत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल दिवसभरात 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याने सक्रिय रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 2582 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात 227 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जळगाव जिल्ह्यात 451 नवे रुग्ण
जळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 451 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 43हजार 705 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या 3034 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आज दिवसभरात 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
यवतमाळ जिल्ह्यातही उद्रेक
यवतमाळ जिल्ह्यातही हल्ली नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होताना दिसतोय. यवतमाळ जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 358 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या ही 1091 इतकी आहे. दरम्यान रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण सध्या गृह विलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 74,581 रुग्ण आढळले आहेत. तर 71,701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1789 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.25 टक्के आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 21.96 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.40 आहे.
(अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)
वाशिम जिल्ह्यात तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक वाढ
वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात 169 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 71 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आजची रुग्णवाढ ही सर्वाधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42,545 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 41,343 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या 562 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 639 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातही कोरोना वाढला
अकोला जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग भयानक वाढतोय. जिल्हायत आज दिवसभरात तब्बल 469 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अकोला जिल्ह्यात सध्या 2152 रुग्ण सक्रिय आहेत.
अकोला जिल्ह्यातील गेल्या पाच दिवसातील आकडेवारी
15 जानेवारी - 246
16 जानेवारी - 291
17 जानेवारी - 123
18 जानेवारी - 367
19 जानेवारी - 398
20 जानेवारी - 469
वर्धा जिल्ह्यात 420 नवे कोरोनाबाधित
वर्धा जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 420 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या 1694 सक्रिय रुग्ण आहेत. वर्धा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 52 हजार 20 इतकी आहे. यापैकी 48 हजार 936 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यात दिवसभरात 224 नवे रुग्ण
जालना जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 224 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 173 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. तर गेल्या पाच दिवसात तब्बल 899 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात सध्या 1162 सक्रिय रुग्ण आहेत.
(खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल!)
जालना जिल्ह्यातील पाच दिवसांची आकडेवारी
16 जानेवारी - 185
17 जानेवारी - 109
18 जानेवारी - 99
19 जानेवारी - 282
20 जानेवारी - 224
परभणी जिल्ह्यात 232 नवे कोरोनाबाधित
परभणी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 232 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या 1273 सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात 68 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पुणे जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे पुण्यात कोरोना संसर्गाच्या या तिसऱ्या लाटेतील (Corona Third Wave) सर्वाधिक रुग्णांच्या आकडेवारीची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात (Pune District Corona) आज दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 8 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पुणे शहरात (Pune City Corona) कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये पुणे शहरातीलच रुग्णांची आकडेवारी ही सर्वाधिक आहे. पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 7 हजार 64 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराचा नंबर लागतो. पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 94 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण (Pune Rural) भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज तब्बल 2 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.