पटियाला, 29 जुलै : आई-मुलाचं नातं हे जगातलं सर्वात श्रेष्ठ नातं मानलं जातं. कारण इतर कोणाहीपेक्षा आपण आईसोबत 9 महिने जास्त जगलेलो असतो. आईशिवाय आपण जगण्याचा विचारही करू शकत नाही. म्हणूनच म्हटलं जातं, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. पंजाबमध्ये एकमेकांपासून दुरावरलेल्या एका आई-मुलाचं अनोखं मिलन घडलं आहे. तब्बल 35 वर्षांनंतर ते दोघं एकमेकांसमोर आले. ही कहाणी एखाद्या चित्रपटासारखी वाटत असली, तरी असं वास्तवात खरोखर घडलंय. पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरात हजारो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार उघडल्यावर पडले आहेत. अशातच एका घरात मात्र अनेक वर्ष दुरावलेलं सुख परत आलंय. दूर गेलेल्या आपल्या आईला जगजीत सिंह यांनी 35 वर्षांनंतर आता डोळे भरून पाहिलं.
पटियालामधील बोहरपूर गावात 20 जुलै रोजी तब्बल तीन दशकांहून अधिक काळानंतर जगजीत सिंह आणि त्यांची आई हरजीत कौर हे एकमेकांसमोर आले. दोघांनाही अश्रू अनावर झाले. दोघांनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली की, जणू आता कधीही एकमेकांपासून दूर न जाण्यासाठी. मिळालेल्या माहितीनुसार, जगजीत हे सहा महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं आणि जगजीत हे दोन वर्षांचे असल्यापासून आजी-आजोबांजवळ राहू लागले. ते जसजसे मोठे झाले, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, त्यांच्या आई-वडिलांचं अपघातात निधन झालं. मात्र अनेक वर्षांनंतर त्यांच्या आत्याने त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. मग जगजीत यांनी आपल्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. आईला ओळखणारे बरेचजण आता या जगात नव्हते. मात्र जगजीत यांनी हार मानली नाही. 5 वर्ष शोध घेतल्यानंतर अगदी ध्यानीमनी नसताना आई जेव्हा समोर येऊन उभी राहिली, तेव्हा मात्र त्यांच्या भावनांचा बांध फुटला. एकाच राशीत करणार 4 ग्रह प्रवेश! ‘या’ 3 राशींसाठी ठरेल उत्तम काळ आत्याने आईबाबत सांगितल्यानंतर जगजीत हे त्यांच्या आजोळी गेले आणि आजीकडे आईबाबत विचारणा केली. प्रश्नांचा भडीमार केल्यावरही आजी काही सांगण्यास तयार नव्हती. मात्र ‘मी आई यांच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे, हे मला माहित आहे’, असं जगजीत यांनी सांगितल्यानंतर आजीला रडू कोसळलं. त्यानंतर अखेर त्यांची आईशी भेट झाली. त्यांची आई आता वृद्ध झाली असून त्यांना व्यवस्थित चालत येत नाही. आता जगजीत त्यांची काळजी घेतील.