ज्योतिष शास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. एखाद्या ग्रहाच्या एखाद्या राशीतील प्रवेशाचा इतर सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. आता येत्या 17 ऑगस्ट रोजी शुक्र, चंद्र, मंगळ आणि बुध हे ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवार या शुभ दिनी 4 ग्रहांचा सिंह राशीत प्रवेश होणार असून याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. यापैकी धनू, मिथुन आणि वृषभ या 3 राशींच्या व्यक्तींसाठी हा ग्रहप्रवेश अत्यंत लाभदायी ठरणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आपल्यासाठी चतुर्ग्रही योग अत्यंत चांगला ठरेल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो. कुटुंबात शुभ कार्य घडू शकतं. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
धनू : आपल्यासाठी चतुर्ग्रही योग अत्यंत चांगला ठरेल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो. कुटुंबात शुभ कार्य घडू शकतं. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
वृषभ : चतुर्ग्रही योगानिमित्त आपल्या वाटल्या अधिक सुख येणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीची संधी मिळेल. धनलाभ होईल. कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल.