मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात दमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने बनवले खास फटाके? WhatsApp वर केला जातोय दावा

भारतात दमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने बनवले खास फटाके? WhatsApp वर केला जातोय दावा

Fire-Crackers (Representational Image)

Fire-Crackers (Representational Image)

या मेसेजमध्ये विशेष सूचनेच्या मथळ्याखाली असं म्हटलं आहं की, 'इंटेलिजन्सनुसार पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी भारताचा बदला घेण्यासाठी चीनकडे मागणी केली आहे'.

    नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: देशभरात नवरात्रोत्सवाचा (Navratri 2021) उत्साह आहे. या सणानंतर काहीच दिवसात भारतीय नागरिक दिवाळीचा (Diwali 2021) आनंद लुटताना दिसतील. दरम्यान हा दिव्यांचा सण साजरा करताना दिव्यांची आरास करा, रांगोळी काढा, मिठाई-फराळ वाटा असं आवाहन करणारे मेसेज अनेकांना आतापर्यंत येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर फटाके वाजवून प्रदूषण करू नका तसंच चिनी माल न वापरता स्वदेशी वापरा असाही संदेश दिला जातो. मात्र हे संदेश देताना काही अफवांचा (Fake Messages on WhatsApp) देखील प्रसार होत आहे. गृह मंत्रालयाच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका आणि चिंता करू नका. कारण सरकारकडून अशी कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही आहे. काय आह या WhatsApp मेसेजमध्ये? या मेसेजमध्ये विशेष सूचनेच्या मथळ्याखाली असं म्हटलं आहं की, 'इंटेलिजन्सनुसार पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी भारताचा बदला घेण्यासाठी चीनकडे मागणी केली आहे. चीनने भारतात अस्थमा पसरवण्याठी फटाके विशिष्ट प्रकारे बनवले आहेत. जे कार्बन मोनोऑक्साइड गॅसचे विषारी आहेत. याशिवाय भारतात डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी विशेष प्रकारची सजावटी लाइटिंग देखील बनवण्यात येत आहे. यात मोठ्या संख्येने पाऱ्याचा वापर केला जात आहे. या दिवाळीत चिनी उत्पादनांचा वापर करू नका. हा मेसे सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा.' ही सूचना गृहमंत्रालयाकडून आल्याचे या WhatsApp मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान अशाप्रकारे कोणतीही सूचना दिली नसल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने स्पष्ट केले आहे. Air India Sale:टाटांसमोर मोठं आव्हान, 4विमानसेवांचं शेड्यूलिंग सांभाळण्याची कसरत पीआयबी फॅक्ट चेकने काय म्हटलं? 3 नोव्हेंबर 2020 रोजी पीआयबी फॅक्ट चेकने केलेलं हे ट्वीट अलीकडेच रिट्वीट केले आहे. त्यामुळे यावर्षी देखील दिवाळीआधी तुम्हाला असा मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. गृह मंत्रालयाने अशीकोणतीही सूचना न दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: China, India china, PIB

    पुढील बातम्या