मराठी बातम्या /बातम्या /देश /भारताच्या राष्ट्रपतींना दर महिन्याला किती मिळते सॅलरी? निवृत्तीनंतरही मिळतात या सुविधा...

भारताच्या राष्ट्रपतींना दर महिन्याला किती मिळते सॅलरी? निवृत्तीनंतरही मिळतात या सुविधा...

राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असण्याबरोबरच देशाचे पहिले नागरिक आणि देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती असतात.

राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असण्याबरोबरच देशाचे पहिले नागरिक आणि देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती असतात.

राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असण्याबरोबरच देशाचे पहिले नागरिक आणि देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती असतात.

  नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र शिकताना भारतीय राज्यव्यवस्था, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, लोकशाही, राज्यघटना हे सगळे शब्द परिचयाचे झालेले असतात. संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या देशाचे सर्वोच्च, परंतु नामधारी शासन प्रमुख राष्ट्रपती (President Of India) असतात. केंद्र (Central) आणि राज्य (State) अशा दुहेरी शासन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपतिपदाची निर्मिती करण्यात आली आहे. देशाचा सर्व राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असण्याबरोबरच देशाचे पहिले नागरिक आणि देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती असतात.

  संसदेच्या दोन्ही सभागृहांतल्या सदस्यांमार्फत राष्ट्रपतींची निवड केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. जगातलं सर्वांत मोठं राष्ट्रपती भवन असलेल्या दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींचं वास्तव्य असतं. ही सगळी माहिती आपल्याला अभ्यासक्रमातल्या पुस्तकात मिळत असली, तरी राष्ट्रपतिपद भूषवणाऱ्या व्यक्तीला वेतन किती मिळत असेल, कोणते लाभ मिळत असतील, याबाबत माहिती नसते. त्यामुळे नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात त्याबद्दल उत्सुकता असते. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  भारताच्या राष्ट्रपतिपदाची परंपरा अत्यंत उज्ज्वल असून, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे होते. सध्या देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये वेतन (Salary) मिळतं. या वेतनाव्यतिरिक्त अनेक भत्ते आणि काही लाभ त्यांना मिळतात. त्यामध्ये निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा इत्यादींचा समावेश असतो. निवृत्तीनंतरही त्यांना अनेक सेवा-सुविधा मिळतात.

  हे ही वाचा-'तिथल्या हिंदू, शिख बांधवांना..'; अफगाणिस्तानातील स्थितीवर मोदींची प्रतिक्रिया

  निवासस्थान : नवी दिल्लीमध्ये असलेलं राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) हे भारताच्या राष्ट्रपतींचं अधिकृत निवासस्थान आहे. 2 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या राष्ट्रपती भवनात तब्बल 340 खोल्या आहेत.

  वैद्यकीय सुविधा : राष्ट्रपतींना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सेवा मिळते.

  सुरक्षा/वाहन : भारताच्या राष्ट्रपतींसलाठी कस्टम-बिल्ट ब्लॅक मर्सिडीज बेंझ एस 600 (डब्ल्यू 221) पुलमॅन गार्ड ही सुसज्ज गाडी असते. अधिकृत दौऱ्यात राष्ट्रपतींसाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी लिमोझिन तैनात असते.

  देशाचं अत्यंत मानाचं असं राष्ट्रपतिपद भूषवणाऱ्या व्यक्तीला निवृत्तीनंतरही अनेक लाभ मिळतात.

  - राष्ट्रपतींना दरमहा 1.5 लाख रुपये पेन्शन (Pension) मिळतं.

  - राष्ट्रपतींच्या जोडीदाराला दरमहा 30 हजार रुपयांची सचिवात्मक मदत मिळते.

  - एक सुसज्ज बंगला

  - दोन मोफत लँडलाइन आणि मोबाइल फोन

  - पाच खासगी कर्मचारी, ज्यांचा वार्षिक खर्च 60,000 रुपये दिला जातो.

  - जोडीदारासह रेल्वे किंवा विमानाने विनामूल्य प्रवास.

  आदी लाभांचा त्यात समावेश आहे.

  First published:
  top videos

   Tags: President, President ramnath kovind, Salary