जाहिरात
मराठी बातम्या / देश / टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करत आहे मोदी सरकार? वाचा सविस्तर

टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करत आहे मोदी सरकार? वाचा सविस्तर

टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करत आहे मोदी सरकार? वाचा सविस्तर

Locusts नावाच्या किड्यांनी देशातील अनेक भागांमध्ये हैदोस घातला आहे. देशातील जवळपास 10 राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरलेल्या या किड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मोदी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, वाचा सविस्तर

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 मे : देशासमोर कोरोनाचे (Coronavirus) संकटं असताना आता आणखीन एक मोठी समस्या समोर आली आहे. Locusts नावाच्या किड्यांनी देशातील अनेक भागांमध्ये हैदोस घातला आहे. देशातील जवळपास 10 राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरलेल्या या किड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मोदी सरकार (Modi Government) काय करत आहे. याकरता सरकारकडून एक योजना बनवण्यात आली आहे. शुक्रवारी लोकस्ट वॉर्निंग ऑर्गेनाइझेशन (Locust Warning Organization)चे अधिकाऱ्यांमध्ये कृषी भवनात यासंदर्भात चर्चा झाली. अशी माहिती मिळते आहे की सरकारने कृषी यांत्रिकीकरण उप-मिशन अंतर्गत जवळपास 800 ट्रॅक्टर्स यासाठी लागणाऱ्या स्प्रेकरता तयार केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील किटकनाशकांचा फवारा करण्यात येणार आहे. (हे वाचा- ‘या’ 4 बँकांवर RBIने ठोठावला 5.45 कोटींचा दंड,नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई ) केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी (Narendra Singh Tomar) देखील लोकस्टवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानाची समीक्षा केली आहे. पंधरवड्याअंतर्गत ब्रिटनकडून 15 स्प्रेअर खरेदी केले जाणार आहेत. यानंतर आणखी 45 स्प्रेअर खरेदी करण्याचा विचार आहे. हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जाऊ शकतो. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या मते उंच भाग आणि दुर्गम ठिकाणी फवारणी करण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात येतील. डीजीसीएने (DGCA) ने याकरता परवानगी दिली आहे. (हे वाचा- ड्रोनद्वारे केली जाणार औषधांची घरपोच डिलिव्हरी, स्पाइसजेट सुरू करतंय ही खास सेवा ) तोमर यांच्या म्हणण्यानुसार सर्व राज्यांबरोबर मिळून आवश्यक ती पावलं उचलण्यात येणार आहेत. सर्व राज्यांसाठी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. क्षेत्रवार 11 नियंत्रण कक्षांची स्थापना देखील करण्यात आली आहे, विशेष दल देखील तैनात करण्यात आले आहेत. वाहने, ट्रॅक्टर्स आणि किटकनाशकांच्या खरेदीसाठी 14 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य राजस्थानला देण्यात आले आहेत. तर गुजरातला 1.80 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात