सैन्याधिकारी म्हणतात, 'बालाकोट'चेही पुरावे आहेत, त्याबद्दल भारत सरकार घेईल निर्णय

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बालाकोट परिसरातले जैश ए मोहम्मदचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले याच्या पुराव्यांविषयी विचारलं असता एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर यांनी आमच्याकडे पुरावे आहेत, असं सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 08:11 PM IST

सैन्याधिकारी म्हणतात, 'बालाकोट'चेही पुरावे आहेत, त्याबद्दल भारत सरकार घेईल निर्णय

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच इरादा होता, हे सिद्ध करणारे पुरावे या पत्रकार परिषदेनंतर दाखवण्यात आले. पाकिस्तानचं F16 विमान पाडल्याचे पुरावे या वेळी सैन्यदलाने दाखवले. भारताविरोधात पाकिस्तानने मिसाईल्स वापरल्याचा पुरावाही सादर करण्यात आला. 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बालाकोट परिसरातले जैश ए मोहम्मदचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले याच्या पुराव्यांविषयी विचारलं असता एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर म्हणाले, "भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे ठरवलेलं लक्ष्य साधलं आणि मोहीम फत्ते केली. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. पण ते कधी, कसे आणि कुठे सादर करायचे याचा निर्णय भारत सरकारमधल्या उच्चपदस्थांचा आहे", असंही कपूर म्हणाले.

आम्हाला जे साध्य करायचं होतं, ते लक्ष्य आम्ही साधलं. पण किती जण या कारवाईत मृत्युमुखी पडले याचे आकडे सांगता येणार नाही. या कारवाईसाठी मिराज2000 वापरल्याच्या माहितीलाही कपूर यांनी पुष्टी दिली

पाकिस्तानने त्यांच्या ताफ्यातलं F16 लढाऊ विमान भारताविरोधात वापरलं याचे पुरावे दर्शवताना एअरफोर्सचे अधिकारी म्हणाले, "एअर टू एअर मिसाईल वाहून नेण्यासाठीचं हे एकच एअरक्राफ्ट आहे. प्रत्येक लढाऊ विमान हद्दीत प्रवेश करतं तेव्हा त्यांना ओळखायची यंत्रणा आमच्याकडे असते. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असलेले पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांमधून पाकिस्तानी सैन्याचा उद्देश स्पष्ट होता.

भारतीय सैन्यदलाची दक्षता, तत्परता आणि शस्त्रसज्जता यामुळे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले, असं त्यांनी सांगितलं.

ब्रिगेड बटालियन हेडक्वार्टर लक्ष्य केलं. आम्ही तयार होतो. चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान हवाई दलाचे प्रयत्न फसले.

Loading...

एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर यांनी यासंदर्भात विचारलेल्या माहितीवर सांगितलं की, पाकिस्तानने आमच्या आस्थापनांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती, याचे पुरावे आहेत. F16 हे विमान एअर टू एअर मिसाईल्ससाठीच वापरलं जातं. या लढाऊ विमानाचे तुकडे भारताच्या हद्दीत पूर्व राजौरीजवळ सापडले आहेत. याचा अर्थ उघड आहे. पाकिस्तानी हवाई दल मोठं लक्ष्य घेऊन भारतीय हद्दीत आलेलं होतं, असं ते म्हणाले.

अॅमराम मिसाईल्स वापरल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. ही मिसाईल्स भारताच्या लष्करी आस्थापनांविरोधातच वापरण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पण भारतीय सैन्यदलांच्या दक्षतेमुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले, असं भारतीय सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

"पाकिस्तानने वेळोवेळी आपलं निवेदन बदललं. सुरुवातीला त्यांनी 2 भारतीय विमानं पाडल्याचं सांगत 2 वैमानिक ताब्यात असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर संध्याकाळी निवेदन फिरवून एकच पायलट ताब्यात असल्याचं सांगितलं", असं एअर व्हाइस मार्शल कपूर म्हणाले.


संबंधित बातम्या


हे घ्या पुरावे : सैन्यदलाने पाकिस्तानच्या दाव्यांना खोडून काढणारे मिसाईल्सचे तुकडे केले सादर

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचं लक्ष्य हे भारतीय लष्करच होतं


भारताचा डिप्लोमॅटिक विजय; या मोहिमेत भारताने दाखवलेले हे आहेत मुत्सद्देगिरीचे 11 नमुने


वाघा बाॅर्डरवरून परत येणार भारताचा 'वाघ'!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 08:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...