हे घ्या पुरावे : सैन्यदलाने पाकिस्तानच्या दाव्यांना खोडून काढणारे मिसाईल्सचे तुकडे केले सादर

हे घ्या पुरावे : सैन्यदलाने पाकिस्तानच्या दाव्यांना खोडून काढणारे मिसाईल्सचे तुकडे केले सादर

भारत आणि पाकिस्तानातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच इरादा होता, हे सिद्ध करणारे पुरावे या पत्रकार परिषदेनंतर दाखवण्यात आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच इरादा होता, हे सिद्ध करणारे पुरावे या पत्रकार परिषदेनंतर दाखवण्यात आले.

ब्रिगेड बटालियन हेडक्वार्टर लक्ष्य केलं. आम्ही तयार होतो. चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान हवाई दलाचे प्रयत्न फसले.

एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर यांनी यासंदर्भात विचारलेल्या माहितीवर सांगितलं की, पाकिस्तानने आमच्या आस्थापनांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती, याचे पुरावे आहेत. F16 हे विमान एअर टू एअर मिसाईल्ससाठीच वापरलं जातं. या लढाऊ विमानाचे तुकडे भारताच्या हद्दीत पूर्व राजौरीजवळ सापडले आहेत. याचा अर्थ उघड आहे. पाकिस्तानी हवाई दल मोठं लक्ष्य घेऊन भारतीय हद्दीत आलेलं होतं, असं ते म्हणाले.

अॅमराम मिसाईल्स वापरल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. ही मिसाईल्स भारताच्या लष्करी आस्थापनांविरोधातच वापरण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पण भारतीय सैन्यदलांच्या दक्षतेमुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले, असं भारतीय सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

"पाकिस्तानने वेळोवेळी आपलं निवेदन बदललं. सुरुवातीला त्यांनी 2 भारतीय विमानं पाडल्याचं सांगत 2 वैमानिक ताब्यात असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर संध्याकाळी निवेदन फिरवून एकच पायलट ताब्यात असल्याचं सांगितलं", असं एअर व्हाइस मार्शल कपूर म्हणाले.

बालाकोटचे पुरावे आहेत, त्याबद्दल सरकार निर्णय घेईल

"भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे ठरवलेलं लक्ष्य साधलं आणि मोहीम फत्ते केली. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. पण ते कधी आणि कसे सादर करायचे याचा निर्णय भारत सरकारमधली उच्चपदस्थांचा आहे", असंही कपूर म्हणाले.

पाकिस्तानने त्यांच्या ताफ्यातलं F16 लढाऊ विमान भारताविरोधात वापरलं याचे पुरावे दर्शवताना एअरफोर्सचे अधिकारी म्हणाले, "एअर टू एअर मिसाईल वाहून नेण्यासाठीचं हे एकच एअरक्राफ्ट आहे. प्रत्येक लढाऊ विमान हद्दीत प्रवेश करतं तेव्हा त्यांना ओळखायची यंत्रणा आमच्याकडे असते. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असलेले पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांमधून पाकिस्तानी सैन्याचा उद्देश स्पष्ट होता.

भारतीय सैन्यदलाची दक्षता, तत्परता आणि शस्त्रसज्जता यामुळे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचं लक्ष्य हे भारतीय लष्करच होतं

भारताचा डिप्लोमॅटिक विजय; या मोहिमेत भारताने दाखवलेले हे आहेत मुत्सद्देगिरीचे 11 नमुने

वाघा बाॅर्डरवरून परत येणार भारताचा 'वाघ'!

First published: February 28, 2019, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading