नवी दिल्ली 03 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे आपल्या दारासमोर किंवा गॅलरीत दिवा लावण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं. एका व्हिडीओ संदेशातून मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. या आधीही पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होतं. त्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आताही तसाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण या घोषणेनंतर देशाचं ऊर्जा मंत्रालय हादरून गेलं आहे. कारण देशवासियांनी एकाच वेळी लाईट्स बंद केलेत तर मागणीत एकदम घट होऊन नवेच संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे सगळ्यांच्या मानत जो अंधार निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी दिव्यांचा प्रकाश प्रेरणा देईल असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
वीज ही साठवून ठेवता येत नाही. मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे त्याचं काम सुरू असते. पण अचानक वीजेची मागणी एकदम कमी झाली तर देशभरातल्या वीज पुरवठ्या त्याचा विपरीत परिणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर देशभरातला वीज पुरवठा ठप्प होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबतचं वृत्त ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ने दिलं आहे.
मुंबई एअरपोर्टवर कर्तव्य बजावणाऱ्या 11 जवानांना 'कोरोना', CISF कॉलनी केली सील
देशातल्या वीज पुरवढ्याच्या संदर्भात Central Electricity Regulatory Authority (CERC) ने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार त्याचा पुरवठा सुरू असतो. मात्र अचानकच मागणीत घट झाल्यासं सर्व यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयात आज महत्त्वाची बैठकही पार पडली.
मुंबईतली ही 9 ठिकाणं आहेत ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, आता ड्रोन नजर ठेवणार
रविवारी म्हणजे 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातले दिवे बंद करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. ऊर्जा मंत्रालयाचे संबंधीत सर्व विभाग त्यासंदर्भात तयारी करत असून कुठलीही अडचण येणार नाही असंही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.