नवी दिल्ली, 9 मार्च : सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात असलेल्या व्यक्तींनी सतत आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. नसता लहानशा कृतीतूनही ती वाईट हेतूने केलेली असो वा नसो, चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. (West Bengal Assembly Election 2021) विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालमधला एक VIDEO याच कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारानं एका महिला आमदारासोबत भर पत्रकार परिषदेत असं कृत्य केलं की, विरोधी पक्षांनी त्यावरून धारेवर धरलं नसतं तरच नवल होतं. आता हा लहानसाच व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधी पक्ष अर्थात भाजप TMC खासदाराला कोंडीत पकडत चांगलाच समाचार घेत आहेत. (TMC mla touches cheek of woman mla) झालं असं, की भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात एका पत्रकार परिषदेदरम्यान तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चा एक खासदार पक्षातील एका महिला आमदाराचा गाल ओढताना दिसतो आहे. (tmc mla video) हा व्हिडिओ ट्विट करत लॉकेट चॅटर्जी यांनी हे नेते म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचं सांगितलं. ट्विट करताना त्यांनी सोबत लिहिलं, की ‘टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय? हे आहेत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी. हे बांकुराच्या आमदाराचा गाल ओढत आहेत जी तिकीट न मिळाल्यानं नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे!’ (twitter locket chatterjee video)
पश्चिम बंगालमध्ये ऐन निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा व्हिडिओ आला आहे. अर्थात हा व्हिडिओची सत्यासत्यता अजून पडताळली गेलेली नाही. (viral video kalyan banerjee) हेही वाचा Akola News : महिला दिनाच्या दिवशी शिक्षकाने केला सहशिक्षिकेचा विनयभंग! तृणमूल पक्षानं भाजपच्या प्रचार मोहिमेला आव्हान देत बंगालला त्याची मुलगीच पाहिजे, अर्थात ममता बॅनर्जींच पाहिजेत असा नारा दिला आहे. यावरच निशाना साधत लॉकेट चॅटर्जी यांनी व्हिडिओबाबत असे उद्गार काढले आहेत. पुढं त्यांनी हेसुद्धा म्हटलं आहे, की गुन्ह्यांच्या आकड्यात मोडतोड करणाऱ्या पक्षाला आता अचानक मुलीचा विषय ध्यानात आला आहे. हेही वाचा प्रेमप्रकरणात तरुणानं मागितली मदत, पुणे पोलिस आयुक्तांनी दिलं भन्नाट उत्तर कमेंटकर्त्यांना चॅटर्जी हेसुद्धा म्हणताना दिसतात, की रेकॉर्ड पाहिल्यास बलात्कार, छेडछाड, अॅसिड हल्ले या घटनांमध्ये मागच्या दहा वर्षांत अजिबात घट झालेली नाही. मात्र राज्य सरकारनं महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचे खरे आकडे एनसीआरबीला उपलब्ध होऊ दिले नाहीत.