पश्चिम बंगाल, 18 डिसेंबर: गर्लफ्रेंडनं (Girlfriend) बॉयफ्रेंडवर (Boyfriend) गोळी झाडल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघं बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सध्या रिलेशनशिपमध्ये (Relationship) येणाऱ्या दुराव्यामुळे गर्लफ्रेंडनं (Girlfriend Shot Boyfriend) हे पाऊल उचललं आहे.
याआधी गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला किस केलं. दोघांनी मिळून सिगारेट ओढली आणि त्यानंतर अचानक गर्लफ्रेंडनं अचानक बॉयफ्रेंडसमोर बंदूक दाखवून गोळीबार केला. ही घटना पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्व वर्धमान (East Wardhman) जिल्ह्यातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बंदुकीसह अटक केली आहे.
हेही वाचा- क्रिकेटवर कोरोनाचं संकट कायम, वेस्ट इंडिजनंतर 'या' टीमचे 4 खेळाडू पॉझिटिव्ह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कटवा पोलीस ठाण्या अंतर्गत (Katwa Police Station) येणाऱ्या केसिया गावातील बुधवारी रात्रीची आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत जखमी तरुणानं सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड नुकतीच तिचं घर झारखंड येथून परतली होती. ही तरुणी काही महिन्यांपूर्वी तेथे नोकरीसाठी गेली होती. परतल्यानंतर तरुणीनं त्याला स्थानिक सर्कस मैदानावर येण्यास सांगितलं.
आधी किस घेतलं मग सिगारेट ओढली मग झाडली गोळी
गर्लफ्रेंडनं तरुणाला मिठी मारली, त्याचं किस घेतलं. सिगारेट ओढली आणि अचानक तिनं तरुणाकडे बंदूक दाखवली आणि त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, ही गोळी तरुणाला स्पर्श करुन निघून गेली. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
हेही वाचा- लग्नानंतर 7 वर्षांनी पतीने घेतला 2 मुलांसह पत्नीचा जीव; धक्कादायक कारण समोर
या घटनेनंतर आरोपी तरुणीनं तरुणाला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणानं गोंधळ घातला आणि आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले आणि पीडित तरुणानं पोलिसांना गाठून संपूर्ण घटना सांगितली.
काही महिन्यांपासून वाढला होता दोघांमधला दुरावा
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. तिनं तरुणावर गोळीबार केलेली बंदूकही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील दुरावा वाढला होता, त्यामुळे रागाच्या भरात तरुणीनं बॉयफ्रेंडवर गोळ्या झाडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, त्यानंतरच या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, West bengal