जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटवर कोरोनाचं संकट कायम, वेस्ट इंडिजनंतर 'या' टीमचे 4 खेळाडू पॉझिटिव्ह

क्रिकेटवर कोरोनाचं संकट कायम, वेस्ट इंडिजनंतर 'या' टीमचे 4 खेळाडू पॉझिटिव्ह

क्रिकेटवर कोरोनाचं संकट कायम, वेस्ट इंडिजनंतर 'या' टीमचे 4 खेळाडू पॉझिटिव्ह

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला (West Indies Cricket Team) कोरोनामुळे पाकिस्तान दौरा स्थगित करावा लागला. आता त्यानंतर आणखी एका देशाच्या टीमला कोरोनाचा फटका बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोरोनाचा अडथळा कायम आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीममधील (West Indies Cricket Team) 6 खेळाडूंसह 9 जणांना नुकतीच कोरोनाची (Coronavirus) लागण झाली. यामुळे वेस्ट इंडिजला पाकिस्तान विरुद्धची वन-डे सीरिज स्थगित करावी लागली. त्यानंतर आता आणखी एका टीमचे 4 खेळाडू आणि असिस्टंट कोच  कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वेस्ट इंडिजनंतर आता आयर्लंड क्रिकेट टीमला (Ireland Cricket Team) कोरोनाचा फटका बसला आहे. ही टीम अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे आता आयर्लंड क्रिकेट बोर्डाने लंका प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेला फास्ट बॉलर जोश लिटीलला परत बोलावले आहे. क्रिकेट आयर्लंडने दिलेल्या माहितीनुसार, बॅरी मॅक्कार्थी आणि जॉर्ज डॉकरेल या दोघांना कोरोना झाला  आहे. त्यामुळे हे टीमसोबत मियामीला जाणार नाहीत. त्यांचा आयसोलेशनचा कालवाधी संपल्यानंतर तसेच कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हे दोघं टीममध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर हॅरी टेक्टर आणि गॅरेथ डिलेनी हे दोघे फ्लोरिडामध्ये अमेरिकन टी20 ओपन स्पर्धा खेळत होते. या स्पर्धेतून परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनाही 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. वेस्ट इंडिज टीमलाही फटका पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज टीमलाही कोरोनाचा फटका बसला. शाही होप (Shai Hope), स्पिनर अकिल हुसेल (Akil Hosein) आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस ( Justin Greaves) हे तीन खेळाडू बुधवारी पॉझिटिव्ह आढळले. त्याचबरोबर वेस्ट टीमचे असिस्टंट कोच आणि फिजिशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे. अश्विन आणि धोनी पुन्हा येणार एकत्र? दिग्गज स्पिनरनं ऑक्शनपूर्वी दिले संकेत यापूर्वी वेस्ट इंडिज टीममधील  फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell), ऑल राऊंडर रोस्टन चेज (Rosten Chase) आणि काईल मेयर्स (Kyle Mayers) यांना कोरोना झाला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाकिस्तानातील वन-डे मालिका स्थगित करत परत जाण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही देशांमधील ही मालिका जून 2022 मध्ये होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात