Home /News /national /

लग्नानंतर 7 वर्षांनी माथेफिरू पतीने घेतला 2 मुलांसह पत्नीचा जीव; धक्कादायक कारण समोर

लग्नानंतर 7 वर्षांनी माथेफिरू पतीने घेतला 2 मुलांसह पत्नीचा जीव; धक्कादायक कारण समोर

येथे पत्नीनं हुंड्याला (Dowry) विरोध केल्यानं पतीने पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची विष (Poisoning) पाजून हत्या केली.

    बिहार, 18 डिसेंबर: बिहारमध्ये (Bihar) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बिहारमधील नालंदा येथे एका विक्षिप्त पतीनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. येथे पत्नीनं हुंड्याला (Dowry) विरोध केल्यानं पतीने पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची विष (Poisoning) पाजून हत्या केली. पतीच्या छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केल्याचंही येथे बोललं जात आहे. पतीकडून हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून महिलेनं आपल्या दोन मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. धक्कादायक म्हणजे दोघांचं 2015 ला लग्न झालं होतं. लग्नाला 7 वर्ष झाल्यानंतर ही पती हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत होता. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत असे इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बधी चकियापार गावातील गुड्डू पासवान याने पत्नी ज्ञानती देवी, 3 वर्षांचा मुलगा साहिल कुमार आणि 1 वर्षाची मुलगी स्नेहा कुमारीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हेही वाचा-  VIDEO: हातात घेतली झाडू, अन् स्वतः ऊर्जामंत्र्यांनी स्वच्छ केलं शाळेचं टॉयलेट ज्ञानतीदेवीच्या भावानं या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, दोघांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर तिचा पती हुंड्यासाठी छळ करत असे. काही दिवसांपूर्वी तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून देण्यात आलं होतं. पंचायत झाल्यानंतर मारहाण न करण्याच्या अटीवर तिला सासरच्या घरी जाऊ दिलं. गुरुवारी त्यानं पुन्हा एकदा पत्नीला माहेरच्याकडून पैसे मागण्यास सांगितलं. पत्नीनं याला विरोध केला, त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. जेवणात मिसळलं विष यानंतर पतीने गुपचूप जेवणात विष मिसळून पत्नी आणि दोन्ही मुलांना पाजले आणि घर सोडून पळून गेला. येथे जेवण करून सर्वजण झोपायला जात असताना त्यांची तब्येत बिघडली. म्हणून तिनं फोन करुन विष दिल्याचं सांगितलं. त्यानंतर माहेरचे नातेवाईक तात्काळ गावात पोहोचले आणि तिघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे महिलेनंतर दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला. पोलीस सांगताहेत आत्महत्या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर ठाण्याचे पोलीस गावात पोहोचून तिन्ही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस स्टेशन अधिकारी जन शेखर सिंह यांनी सांगितलं की, घरगुती वादातून महिलेनं मुलांसह विष प्राशन केल्याचं प्रकरण समोर येत आहे. तर महिलेच्या माहेरचे पतीनं विष दिल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या