जाहिरात
मराठी बातम्या / देश / 10 वर्षे सत्तेत असणाऱ्या CMच्या मेहुणीची वाईट अवस्था; फुटपाथावर राहून सुरुये जगण्याचा संघर्ष

10 वर्षे सत्तेत असणाऱ्या CMच्या मेहुणीची वाईट अवस्था; फुटपाथावर राहून सुरुये जगण्याचा संघर्ष

मागील दोन वर्षांपासून इरा बसू फुटपाथवर राहत जगण्याचा संघर्ष करत आहेत. (Photo- Asianet News)

मागील दोन वर्षांपासून इरा बसू फुटपाथवर राहत जगण्याचा संघर्ष करत आहेत. (Photo- Asianet News)

सध्या सोशल मीडियावर एका भिकारी महिलेचा फोटो वेगानं व्हायरल (Beggar woman viral photo) होताना दिसत आहे. संबंधित फोटोतील भिकारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून 10 वर्षे सत्तेत राहणाऱ्या एका माजी मुख्यमंत्र्यांची मेहुणी (Former CM’s Sister in law) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकत्ता, 11 सप्टेंबर: सध्या सोशल मीडियावर एका भिकारी महिलेचा फोटो वेगानं व्हायरल (Beggar woman viral photo) होताना दिसत आहे. संबंधित फोटोतील भिकारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून 10 वर्षे सत्तेत राहणाऱ्या एका माजी मुख्यमंत्र्यांची मेहुणी (Former CM’s Sister in law) आहे. कधी काळी VIP आयुष्य जगणाऱ्या या महिलेची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सध्या ती फुटपाथावर झोपून आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. यानंतर संबंधित महिलेला कोलकत्ता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याठिकाणी तिच्यावर उपचार केले जात आहेत. संबंधित भिकारी महिलेचं नाव इरा बसू असून त्या बुद्धदेव भट्टाचार्य (former CM buddhadev bhattacharya) यांची मेहुणी (sister in law) आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे 10 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (west bengal CM) सत्तेत होते. त्यामुळे त्यांच्या मेहुणीचा हा फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इरा बसू (Ira Basu) यांनी विषाणूशास्त्रात पीएचडी पूर्ण केली आहे. त्या इंग्रजी आणि बंगाली दोन्ही भाषेत बोलू शकतात. एवढंच नाही तर त्या राज्यस्तरीय खेळाडू देखील होत्या. त्यांना टेबल टेनिस आणि क्रिकेटमध्ये विशेष आवड होती. हेही वाचा- वेडी ठरवत पतीनेच पत्नीला भोंदूबाबाच्या स्वाधीन केलं; घृणास्पद घटनेनं पुणे हादरलं पण मागील दोन वर्षांपासून इरा बसू फुटपाथवर राहत जगण्याचा संघर्ष करत आहेत. यापूर्वी त्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये लाइफ सायन्स शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 1976 पासून त्या याच शाळेत कार्यरत होत्या. यानंतर 2009 साली त्या निवृत्त झाल्या. त्यावेळी बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. निवृत्तीच्या वेळी त्या बारानगरमध्ये राहत होत्या. नंतर त्या पश्चिम बंगालच्या खरदाह येथील लिचू बागान येथे राहायला गेल्या. त्यानंतर त्या अचानक या पत्त्यावरून गायब झाल्या होत्या. हेही वाचा- ‘‘तरुण आत्महत्या करतोय’’, Facebookच्या आयर्लंड ऑफिसमधून थेट दिल्लीत फोन पण अलीकडेच त्या डनलप येथील रस्त्यांवर भिकाऱ्याच्या अवस्थेत फिरताना दिसल्या आहेत. याबाबत माहिती देताना प्रियनाथ शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णकली चंदा यांनी सांगितलं की, इरा बसू याच शाळेत शिकवायच्या. निवृत्तीनंतर त्यांनी पेन्शन मागितली होती. त्यासाठी आम्ही सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं. पण त्यांनी कागदपत्रं सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांना सध्या पेन्शन मिळत नाही. म्हणूनच त्यांची ही वाईट अवस्था झाली असावी. हेही वाचा- प्रेमात धोका मिळाल्यानं प्रेयसी बनली खूनी; साखरपुड्याच्या दिवशीच BFचा चिरला गळा विशेष म्हणजे 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिनानिमित्त एका संस्थेनं इरा बसू यांना शाळेत बोलवलं होतं. यावेळी पुष्पहार घालून आणि मिठाई देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्या म्हणाल्या की, सर्व शिक्षक अजूनही माझ्यावर प्रेम करतात. बरेच विद्यार्थी माझी अजूनही आठवण काढतात. मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करत होते तेव्हा मला कोणताही लोभ नव्हता आणि आताही नाही. मी जे काही केलं ते स्वतः च्या हिंमतीवर केलं. मला कोणत्याही व्हीआयपी लोकांच्या ओळखीची गरज नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात