मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Assembly Elections 2021 : 'कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममता बंधक होण्यास तयार होत्या,' वाजपेयी सरकारमधील मंत्र्यांचा दावा

West Bengal Assembly Elections 2021 : 'कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममता बंधक होण्यास तयार होत्या,' वाजपेयी सरकारमधील मंत्र्यांचा दावा

'कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी (Kandahar incident) अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात सोपवण्याची ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तयारी होती.'

'कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी (Kandahar incident) अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात सोपवण्याची ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तयारी होती.'

'कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी (Kandahar incident) अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात सोपवण्याची ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तयारी होती.'

कोलकाता, 13 मार्च : 'कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी (Kandahar incident) अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात सोपवण्याची ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तयारी होती.' असा दावा तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या अटल वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी  केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) निमित्ताने यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिन्हा यांनी हा दावा केला आहे.

'इंडियन एअरलाईन्सचं विमान अपहरण करुन कंदहारमध्ये नेण्यात आलं होतं. या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. अतिरेक्यांनी सर्व प्रवाशांची सुटका करावी, त्याबदल्यात ममतांची अतिरेक्यांच्या ताब्यात जाण्याची आणि त्यानंतरच्या सर्व परिणांमांना सामोरे जाण्याची तयारी होती, असा दावा सिन्हा यांनी केला आहे.

#WATCH | TMC Yashwant Sinha says, Mamata Banerjee wanted to offer herself as a hostage in exchange for passengers of the hijacked plane in 'Kandahar incident', for the country. pic.twitter.com/Pf1CBJGLyg

— ANI (@ANI) March 13, 2021

अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सिन्हा यांनी अर्थ मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यानंतर सिन्हा नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा देखील दिला होता.

( वाचा : 'तृणमूल काँग्रेस म्हणजे...', ममतांविरुद्ध अर्ज भरताच भाजपा नेत्याचा हल्लाबोल )

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. देशाचे मूल्य संकटात आहे आणि त्यांचं पालन देखील होत नाही आहे. लोकशाहीची शक्ती आपल्या संस्थांमध्ये असते पण आज त्या दुर्बल झाल्या आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेचाही यात समावेश आहे. सिन्हा म्हणाले की, सरकारच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आता कोणी उरलेलं नाही.

सिन्हा यांनी निवडणूक आयोगावर देखील गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की की, ' निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था राहिली नाही आहे. तोडून मोडून निवडणूक (8 टप्प्यात होणारी निवडणूक) घेण्याचा निर्णय मोदी-शाह यांच्या नियंत्रणात घेण्यात आला आहे आणि भाजपला फायदा कसा होईल याची खबरदारी घेण्यात आली आहे.'

First published:
top videos

    Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, PM narendra modi, TMC, Trinamool congress, West bengal, West Bengal Election