मराठी बातम्या /बातम्या /देश /

West Bengal Assembly Election 2021 : 'तृणमूल काँग्रेस म्हणजे...', ममतांविरुद्ध अर्ज भरताच भाजपा नेत्याचा हल्लाबोल

West Bengal Assembly Election 2021 : 'तृणमूल काँग्रेस म्हणजे...', ममतांविरुद्ध अर्ज भरताच भाजपा नेत्याचा हल्लाबोल

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Election 2021) राज्यातील नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार (BJP) शुभेद्रू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांनी अर्ज भरला आहे.

  • Published by:  News18 Desk

नंदीग्राम, (पश्चिम बंगाल)  12 मार्च : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Election 2021) राज्यातील नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार (BJP) शुभेद्रू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांनी अर्ज भरला आहे. नंदीग्राममध्ये त्यांची लढत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींशी (Mamata Banerjee) होणार आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आता पूर्वीचा पक्ष राहिला नाही, असा आरोप ममता बॅनर्जींचे जुने सहकारी असलेल्या अधिकारी यांनी केला आहे. या निवडणुकीत आपणच विजयी होणार असल्याचं सांगत 2 मे रोजी मिठाई खाण्यासाठी या, असं निमंत्रण त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना दिलं आहे.

तृणमूल काँग्रेस म्हणजे एक खासगी कंपनी झाली असून तिथे फक्त ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे मुक्तपणे बोलू शकतात, असा आरोप त्यांनी केला. अधिकारी यांनी यावेळी अभिषेक मुखर्जींवर जोरदार टीका केली. 'थायलंडमधील एका बँक खात्यामध्ये लाखो रुपये कोणी जमा केले आणि इतकी मोठी रक्कम कुठून आली? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

शारदा चिटफंड घोटाळ्यात ज्यांच्यी फसवणूक झाली आहे, अशा मंडळींचे पैसे फक्त भाजपाच परत आणेल असा दावा अधिकारी यांनी यावेळी केला.

नंदीग्राम दौऱ्यावेळी ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याचा प्रश्न अधिकारी यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी, 'मी फक्त राजकीय विषयांवर बोलणार आहे. अन्य विषयांवर मला काहीही बोलायचं नाही, असं सांगत या विषयावर त्यांनी बोलणं टाळलं.

( वाचा : जखमी झाल्यानंतर ममतांची पहिली प्रतिक्रिया, हॉस्पिटलच्या बेडवरुन कार्यकर्त्यांना म्हणाल्या... )

कोण आहेत शुभेंद्रू अधिकारी?

नंदीग्राम हा तृणमुल काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात शुभेंद्रू अधिकारी यांचं मोठं योगदान होतं. ममता आणि अधिकारी यांनी नंदीग्राममध्येच एकत्र येऊन डाव्या पक्षांच्या विरोधात संघर्ष सुरू केला आणि 34 वर्षांनी बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झालं.

ममता यांचा नंदीग्राम हा बालेलिल्ला इतकी वर्ष सांभाळणारे अधिकारी आता भाजपामध्ये आहेत. ममता यांना आपण किमान 50 हजार मतांनी हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 2016 मध्ये झालेल्या नंदीग्राम विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांना एकूण मतदानामधील 66.79 % मतं मिळाली होती. त्यावरुन या भागात अधिकारी यांचा असलेला दबदबा लक्षात येईल.

First published:

Tags: Assembly Election 2021, BJP, Congress, Mamata banerjee, West bengal, West Bengal Election