जाहिरात
मराठी बातम्या / देश / West Bengal Assembly Election 2021: ममतांच्या 'गोत्र' कार्डवर ओवैसींचा पलटवार, दीदींना विचारला प्रश्न

West Bengal Assembly Election 2021: ममतांच्या 'गोत्र' कार्डवर ओवैसींचा पलटवार, दीदींना विचारला प्रश्न

West Bengal Assembly Election 2021: ममतांच्या 'गोत्र' कार्डवर ओवैसींचा पलटवार, दीदींना विचारला प्रश्न

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी निवडणूक प्रचार सभेत बोलताना ‘गोत्र कार्ड’ वापरलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 31 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभेच्या (West Bengal Assembly Election 2021) 30 जागांसाठी 1 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या हायप्रोफाईल नंदीग्राम (Nandigram) मतदारसंघाचाही समावेश आहे. मंगळवारी प्रचार समाप्त होताना ममता बॅनर्जी यांनी गोत्र कार्डचा वापर केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यांनी या विषयावर ममतांवर टीका केली होती. त्यानंतर एआयएमआयएचे (AIMIM) नेता असादुद्दीन ओवैसी यांनी देखील या वादामध्ये (Asaduddin Owaisi) उडी घेतली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष त्यांचा हिंदू चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ओवैसींनी केला आहे. ओवैसींनी बुधवारी ट्विट केलं आहे. ‘माझ्या सारख्या लोकांचं काय जे शांडिल्य नाहीत आणि जानवे देखील घालत नाहीत. आम्ही कोणत्याही देवाचे भक्त नाही. चालिसा किंवा कशाचंही पठण करत नाही. प्रत्येक पक्ष जिंकण्यासाठी हिंदू कार्ड वापरत आहे. ही अनैतिक आणि अपमानास्पद गोष्ट असून कधीही यशस्वी होणार नाही.’ या शब्दात ओवैसींनी दीदींवर पलटवार केला आहे.

null

ममतांनी काय म्हटलं होतं? नंदीग्राममध्ये प्रचार करताना ममतांनी गोत्र कार्डचा वापर केला. ‘निवडणूक प्रचाराच्या वेळी मी एका मंदिरात गेले होते. त्यावेळी पुजारीने मला गोत्र विचारलं. तेव्हा मी त्यांना ‘मां, माटी आणि मानुष’ हे माझे गोत्र असल्याचं सांगितलं. त्यावेळी मला त्रिपुरातील त्रिपुरेश्वरी मंदिरातील घटना आठवली. त्या मंदिरातही पुजारीला गोत्र विचारल्यावर मी हेच उत्तर दिलं होतं. पण, आज मी सर्वांना सांगते की, माझं खरं गोत्र शांडिल्य आहे.’ असं ममतांनी म्हटलं होतं. ( वाचा :  भाजपनं Bengal जिंकल्यास कोण होणार मुख्यमंत्री? Dilip Ghosh यांनी दिले संकेत ) बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जींवर हिंदू विरोधी असल्याची टीका केली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात भाजपा कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ ची घोषणाबाजी देखील केली आहे. मंगळवारी देखील ममतांच्या रोड शो मध्ये हा प्रकार घडला. त्याला उत्तर देण्यासाठी यंदा ममतांचं वेगळंच रुप पाहयला मिळत आहे. यापूर्वी ममता अनेकदा चंडी पठण करताना दिसल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात