मराठी बातम्या /बातम्या /देश /भाजपनं Bengal जिंकल्यास कोण होणार मुख्यमंत्री? Dilip Ghosh यांनी दिले संकेत

भाजपनं Bengal जिंकल्यास कोण होणार मुख्यमंत्री? Dilip Ghosh यांनी दिले संकेत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Elections 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडणार आहे. भाजपनं राज्यात सरकार स्थापन (BJP in West Bengal) झाल्यास मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...

कोलकाता 31 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Elections 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडणार आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच्या चेहऱ्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं राज्यात आपलं सरकार स्थापन (BJP in West Bengal) झाल्यास मुख्यमंत्री कोण (CM Candidate of BJP) असणार याबाबतचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी म्हटलं.

भाजपला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याचा दावा करत घोष मंगळवारी म्हणाले, की राज्यात पुढील सरकार भाजपचंच असेल. ते म्हणाले, की अशा परिस्थितीमध्ये हे गरजेचं नाही की नवनिर्वाचित आमदारानंच मुख्यमंत्री व्हावं. मेदिनीपूरचे खासदार घोष यांनी दावा केला, की पक्षाच्या बाजूनं असणारी मजबूत लाट शेवटच्या टप्प्यापर्यंत अशीच राहिल.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, घोष म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर केवळ भाजपलाच आपल्या विजयाबाबत विश्वास आहे. तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे नेते हताश झाले आहेत. जसं जसं पुढच्या टप्प्यातील मतदान सुरू होईल, तसं भाजपसाठी राज्यातील वातावरण आणखी मजबूत होत जाईल आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पराभवाची जाणीव होईल. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिये यांच्यासह तीन लोकसभा सदस्य आणि एक राज्यसभा सदस्या स्वप्न दासगुप्ता यांनाही उमेदवारी दिली आहे. मात्र, घोष यात सहभागी नाहीत.

भाजपनं जर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणीतरी नवीन आमदारच असणार का? असा प्रश्न घोष यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, की याबद्दलचा कोणताही निर्णय पक्षच घेईल. मात्र, हे गरजेचं नाही की नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री असावा. ममताजी जेव्हा मुख्यमंत्री झाल्या होत्या तेव्हा त्या आमदार नव्हत्या. राज्यात विधानसभेसाठी 294 जागांवर आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला पार पडलं आहे.

First published:

Tags: Assembly Election 2021, BJP, Cm west bengal, West Bengal bjp, West Bengal Election