• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पश्चिम बंगालमध्ये 'काटेकी टक्कर'; TMC ने जारी केली 291 उमेदवारांची यादी; यंदा महिलांसह मुस्लिमांनाही संधी

पश्चिम बंगालमध्ये 'काटेकी टक्कर'; TMC ने जारी केली 291 उमेदवारांची यादी; यंदा महिलांसह मुस्लिमांनाही संधी

West Bengal Assembly Elections 2021: भाजपला कडक आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी कुठून निवडणूक लढवणार?

 • Share this:
  West Bengal Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, 5 मार्च : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीसाठी (West Begnal Assembly election 2021) तृणमूल काँग्रेसने (TMC) 291 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यंदा पक्षाने 100 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये 50 महिला आणि 42 मुस्लीम उमेदवारांचा सहभाग आहे. उत्तर बंगालमधील 3 जागांवर टीएमसीने उमेदवार उतरवले नाहीत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यंदा नंदीग्राम (Nandigram Assembly Seat) या विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवणार आहे. (West Bengal assembly election TMC releases list of 291 candidates) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या की, भवानीपूर विधानसभा जागेवरुन सोभनदेव चट्टोपाध्याय आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जे लोक या निवडणुकीचा भाग होऊ शकत नाही त्यांना विधान परिषदेत आणण्यात येईल. आज आम्ही 294 जागांपैकी 291 जागांची घोषणा केली आहे. दार्जिलिंग, कलिम्पोंग आणि कुर्सियांग या तीन जागांवर आमचे मित्र निवडणूक लढवतील, असंही त्या यावेळी म्हणाल्या. हे ही वाचा-मोहन भागवतांची मुंबईतील 'ती' भेट यशस्वी; प.बंगाल निवडणुकीत भाजप ठरणार गेम चेंजर? 8 टप्प्यांमध्ये निवडणुकांचं नियोजन पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात मतदान होणार आहेत. 297 विधानसभेच्या मतदानासाठी 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल (36 जागा), 29 एप्रिल (35 जागा) अशा प्रकारे नियोजन करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 2 मे रोजी मतमोजणी करण्यात येईल. (West Bengal assembly election TMC releases list of 291 candidates)

  Aitc Candidates 2021 by News18 on Scribd

  ममता बॅनर्जी गेल्या 10 वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत, मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांना कोणत्याही पक्षाकडून कडक आव्हान दिलं जात आहे. भाजपच्या हिंदुत्व राजकीय खेळीचं उत्तर देण्यासाठी ममत बँनर्जी यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल करू शकतात. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंद्रु अधिकारी यांच्यात लढत ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर ही जागा VIP च्या यादीत आली आहे. बंगालचं राजकारण नेमकं काय वळणं घेईल, हे याच जागेवरुन निश्चित होईल. या जागेवरुन शुभेंद्रु अधिकारी विद्यमान आमदार आहेत. आता ममता बॅनर्जींच्या विरोधात शुभेंद्रु स्वत: उभे राहणार की, भाजपच्या दुसऱ्या उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वाचा सविस्तर यादी
  Published by:Meenal Gangurde
  First published: