• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मोहन भागवतांची मुंबईतील 'ती' भेट ठरली यशस्वी; प.बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप ठरणार गेम चेंजर?

मोहन भागवतांची मुंबईतील 'ती' भेट ठरली यशस्वी; प.बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप ठरणार गेम चेंजर?

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती

 • Share this:
  West Bengal Assembly elections : पश्चिम बंगाल, 5 मार्च : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) भाजपच्या वाटेवर आहे. येत्या 7 मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती पुन्हा राजकारण येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ती भेट यशस्वी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी नागपूरमध्ये मिथून यांनी भागवत यांची भेट घेतली होती, त्यावेळी भागवतांना त्यांनी घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेली ही भेट खूप महत्त्वपूर्ण मानली जात होती. (BJPs new game ahead of West Bengal Assembly elections Mithun Chakraborty will joined the party) हे ही वाचा-मोदींच्या विदेश दौऱ्याचे ‘इलेक्शन कनेक्शन’ 21 जागांवर भाजपाची नजर भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात होती, आणि मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचं दिसत होतं. टीएमसी खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या काही दिवसांतच त्यांनी पदावरुन राजीनामा दिला होता. भाजप बंगालमध्ये सत्ताविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. (BJPs new game ahead of West Bengal Assembly elections Mithun Chakraborty will joined the party) काही दिवसांपूर्वी (11 फेब्रुवारी 2021) गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी भाषणात पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवं असल्याचं सांगितलं होतं. पश्चिम बंगालमधील हिंदू मतपेटीसाठी भाजपकडून नवनवे प्रयत्न केले जात आहे. त्यात आता मिथून चक्रवर्ती यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होतो, हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.
  Published by:Meenal Gangurde
  First published: