नवी दिल्ली, 2 मे: निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि बड्या बड्या पक्षांना निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची गणितं आखून देणारे, आडाखे बांधणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor ) यांनी दिलेल्या मुलाखतीत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ‘खूप केलं. आता बास झालं. पुन्हा तेच करायचं नाहीये आता. मला थोडा ब्रेक हवाय. आयुष्यात दुसऱ्याही काही गोष्टी करायच्या आहेत. खूप केलं आता, जागा रिकामी करतो आहे’, असं ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) ममता बॅनर्जींसाठी (Mamata Bannerjee) तृणमूल काँग्रेसची (TMC election stragey) निवडणूक रणनीती या वेळी आखली होती. यापूर्वीही त्यांनी भाजप, शिवसेना, जनता दल आणि इतरही काही पक्षांसाठी काम केलं होतं. त्यांनी अंदाज दिल्याप्रमाणे ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळण्याची शक्यता नजिक दिसत आहे. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या मतमोजणीच्या कलानुसार TMC ने 292 पैकी 200 च्या वर जागांवर आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी भाजपला 100 पार करणंही मुश्कील झाल्याचं दिसत आहे.
LIVE Assembly Election Results 2021 : ममता बॅनर्जी नंदीग्राममधून 1200 मतांनी जिंकल्या, सुवेंद्र अधिकारी पराभूतNews18 ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, “गेली आठ-नऊ वर्षं मी करतो आहे. आयुष्यभर करावं असं हे काम नाही. मी जागा रिकामी करतो आहे. मला ट्रोल करणाऱ्यांनी मला आव्हान दिलं होतं, की माझा अंदाज चुकला आणि भाजपने शंभरी पार केली, तर मी माझी जागा सोडेन. पण आता निकाल सगळ्यांच्या पुढे आहेत आणि तरी मी सांगतो आहे, मी हे काम सोडतो आहे.” “बंगालमधली लढाई ही मोदी विरुद्ध दीदी अशीच होती. दुसऱ्या कुणा नेत्याचं नाव नव्हतंच. TMC साठी नेमका कुठला आडाखा यशस्वी ठरला, हे सांगणं कठीण आहे. अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. 2019 च्या प्रचाराचाच मुद्दा भाजपने पुन्हा बंगालमध्ये चालवला. TMC ने मात्र त्यातून धडा शिकून बदल केले होते. त्याचा फायदा झाला असावा”, असं प्रशांत किशोर म्हणाले. निवडणूक जिंकण्यापूर्वीच, कोरोनापुढे झाली हार; मृत्यू झालेला उमेदवार आघाडीवर
फक्त केंद्रीय मंत्री प्रचाराला आले किंवा रिसोर्सेसचा पुरेपूर वापर केला म्हणजे निवडणूक जिंकता येत नाही. फक्त मातीतला किंवा बाहेरचा (Insider or Outsider) असं नसतं, असं सांगताना ते म्हणाले की, TMC ने बंगाल की बेटी निवडून आली पाहिजे यावर भर दिला, असंही स्पष्ट केलं. निवडणुकीची घोषणा झाली त्याच्याही पूर्वी 21 डिसेंबर 2020 रोजी प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करत थेट आव्हान स्वीकारलं होतं. त्यांनी त्यात स्पष्ट लिहिलं होतं की, “विधासनभा निवडणुकीत भाजपला दोन अंकी संख्या पार करणं प्रचंड अवघड जाईल. त्यांनी यापेक्षा थोडी जरी बरी कामगिरी केली, तरी मी सपशेल माघार घेत हे काम सोडीन.” हे ट्वीट सेव्ह करून ठेवा, असंही त्यांनी त्या वेळी म्हटलं होतं.
For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 21, 2020
PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!
खरं तर प्रशांत किशोर यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या निवडणूक कलांनुसार बंगालमध्ये भाजपला 75च्या आसपास जागांवरच समाधान मानावं लागणार असं दिसतंय. दुसरीतडे ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात जनतेने स्पष्ट बहुमत घातल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.