कोलकाता, 2 मे: निवडणूक निकालांपेक्षाही अधिक चिंता कोरोनाव्हायरच्या (Coronavirus Crisis India) थैमानाी आहे. पश्चिम बंगालमधून त्यातच एक दुर्दैवी बातमी आली आहे. तिथल्या खरदह मतदारसंघात आघाडीवर असलेले TMC नेते काजल सिन्हा यांचं रविवारी सकाळीच कोरोनामुळे निधन झाल्याचं वृत्त आहे.
काजल सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी मतदारसंघात उत्साहाने प्रचार केला होता. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. गेल्या रविवारीच त्यांचं निधन झालं.
आज तकने दिलेल्या बातमीनुसार काजल सिन्हा यांना 21 एप्रिल रोजी कोलकात्याच्या आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 22 एप्रिलला खरदह मतदारसंघात मतदान झालं. त्या दिवशी काजल सिन्हा रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी 25 एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वास्तविक मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी आघाडी घेतली. ते विजयाच्या अगदी जवळ असल्याचं समजतं.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराच्या धुरळ्यात कोरोनाचे सोशल डिस्टन्सिंग वगैरे नियम धाब्यावर बसवले होते. सर्वच पक्षांनी कोरोनाची तमा न बाळगता प्रचार केला आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे आणि बंगालमध्येही नवे रुग्ण आणि कोरोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Election 2021, Mamata banerjee, West Bengal Election