कोलकाता, 7 मार्च : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी औपचारिकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानात आयोजित भाजपाच्या महासभेत मिथुन चक्रवर्ती स्टेजवर उपस्थित होते. त्यावेळी भाजपाचे बंगला प्रभारी कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) आणि बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी त्यांच्या हातामध्ये पक्षाचा झेंडा दिला.
विजयवर्गीय यांनी मिथुन यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर या सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, ''मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.' ते यावेळी पुढे म्हणाले की, 'मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे.''
Actor Mithun Chakraborty joins BJP at PM Shri @narendramodi's rally at Brigade Parade Ground, Kolkata.#ModirSatheBrigade pic.twitter.com/gvIMfmmNFb
— BJP (@BJP4India) March 7, 2021
तृणमुल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथुन बंगालमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. त्यांनी या भाषणात पुढे सांगितले की, "जो तुमचा हक्क हिरावून घेईन आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष करू. आजचा दिवस माझ्यासाठी स्वप्नवत आहे. इतक्या मोठ्या नेत्यांसोबत मी स्टेजवर असेल असा मी कधीही विचार केला नव्हता. बंगालमध्ये राहणाला प्रत्येक जण बंगाली आहे. मला गरिबांसाठी काम करायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे.''
( वाचा : बंगालमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार मिथुन? दिलीप घोषांनी दिलं उत्तर )
बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे. राज्यात 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा कोलकातामध्ये झाली. या सभेच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मिथुन चक्रवर्ती यांनीही याच सभेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, BJP, India, Mithun chakraborty, PM narendra modi, West bengal