जाहिरात
मराठी बातम्या / देश / West Bengal Assembly Elections 2021: मिथुन असणार भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

West Bengal Assembly Elections 2021: मिथुन असणार भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

West Bengal Assembly Elections 2021: मिथुन असणार भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in West Bengal) कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर सभा घेणार आहेत. या सभेमध्ये बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तीदेखील (Mithun Chakraborty) सहभागी होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता 07 मार्च : बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी (West Bengal Assembly Elections 2021) भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in West Bengal) कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर सभा घेणार आहेत. या सभेमध्ये बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तीदेखील (Mithun Chakraborty) सहभागी होणार आहेत. याचठिकाणी ते भाजप प्रवेश करतील, अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी शनिवारी रात्री मिथुन यांची भेटही घेतली आहे. आता बंगालचे भाजप अध्यक्ष घोष यांनी मिथुन यांच्याबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. त्यांना विचारलं गेलं, की मिथुन आज ब्रिगेड मैदानावरील भाजपच्या सभेला जात आहेत. ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का? या प्रश्नावर उत्तर देताना दिलीप घोष म्हणाले, की आधी त्यांना भाजपात प्रवेश करू द्या. सध्या आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हणत त्यांनी म्हटलं. मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवण्याच्या प्रश्नावर घोष म्हणाले, की आधी त्यांना भाजपमध्ये सामील होऊ द्या. सध्या मला याबाबत काही कल्पना नाही. आम्ही असं ऐकलं आहे, की त्यांना पंतप्रधांनाना भेटायचं आहे. याशिवाय माझ्याकडे अजून कोणतीही माहिती नाही. विजयवर्गीय यांनीही शनिवारीच याबद्दलची माहिती दिली होती. ते म्हणाले होते, की माझं मिथुन यांच्यासोबत बोलणं झालं असून त्यांना पंतप्रधानांना भेटायचं आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोलकातामध्ये सभा घेत आहेत. यासाठी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर जय्यत तयारी केली गेली आहे. पंतप्रधान दुपारी 2 वाजता ब्रिगेड मैदानातून जनतेला संबोधित करतील. मिथुनही याठिकाणी उपस्थित असतील आणि पंतप्रधानांच्या आगमनाआधी याठिकाणी ते छोटंस भाषण देतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात