मराठी बातम्या /बातम्या /देश /नंदीग्राममध्ये दीदी विरुद्ध दादा? ममतांच्या घोषणेनंतर भाजपाच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

नंदीग्राममध्ये दीदी विरुद्ध दादा? ममतांच्या घोषणेनंतर भाजपाच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal assembly election 2021)  प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal assembly election 2021) प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal assembly election 2021) प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

कोलकाता, 6 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal assembly election 2021)  प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा राजकीय आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यंदा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून (Nandigram Assembly seat) निवडणूक लढवणार आहेत. तृणमुल काँग्रेसनं (Trinamool Congress) 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाच्या निर्णयाकडं लक्ष

ममता बॅनर्जी यंदा निवडणूक कुठून लढवणार याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु होती. ती चर्चा आता संपुष्टात आली आहे. ममता यांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्ष (BJP) कुणाला उमेदवारी देणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

ममता यांचा नंदीग्राम हा बालेलिल्ला इतकी वर्ष सांभाळणारे शुभेंद्रु अधिकारी (Shubhendu Adhikari) आता भाजपामध्ये आहेत. अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना आव्हान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ममता यांना आपण किमान 50 हजार मतांनी हरवू असा विश्वास अधिकारी यांना आहे. मात्र भाजपानं अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

(हे वाचा-बाँब बनवताना स्फोट की कार्यकर्त्यांवर हल्ला? भाजपमधील 6 जण जखमी)

नंदीग्राम हा तृणमुल काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात अधिकारी यांचं मोठं योगदान होतं. ममता आणि अधिकारी यांनी नंदीग्राममध्येच एकत्र येऊन डाव्या पक्षांच्या विरोधात संघर्ष सुरु केला आणि 34 वर्षांनी बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाले.

2016 मध्ये झालेल्या नंदीग्राम विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांना एकूण मतदानामधील 66.79 % मतं मिळाली होती. त्यावरुन या भागात अधिकारी यांचा असलेला दबदबा लक्षात येईल. मागील निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजपाला फक्त 5.32% मत मिळाली होती.

(हे वाचा : पश्चिम बंगालमध्ये 'काटेकी टक्कर'; TMC ने जारी केली 291 उमेदवारांची यादी; यंदा महिलांसह मुस्लिमांनाही संधी )

भाजपाच्या 5 टक्के मतांच्या जोरावर ममता बॅनर्जींचा दबदबा कमी करणे आणि त्यांना निवडणुकीत पराभूत करणे हे सोपे नाही. त्यामुळेच भाजपानं याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र अधिकारी यांना नंदीग्राममधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं भाजपानं निश्चित केल्यास ती संपूर्ण बंगालमधील लक्षवेधी लढत ठरणार आहे.

First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, TMC, Trinamool congress, West bengal