कोलकाता - पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम (Birbhum) जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी - SIT) स्थापन करण्यात आलं आहे. राज्याच्या ममता बॅनर्जी (Mamata Banergy) सरकारनं मंगळवारी 22 मार्च रोजी ही घोषणा केली. या घटनेतील होरपळून मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 10 वर पोहोचला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी ग्यानवंत सिंग, मिराज खालिद आणि संजय सिंग यांना एसआयटीचं सदस्य करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं. याशिवाय, सरकारने रामपूर हाट पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि तेथील विकास ब्लॉक पोलिस अधीक्षक (SDOP) यांनाही तत्काळ प्रभावानं निलंबित केलं आहे. बीरभूम जिल्ह्यातील रामपूर हाट येथील बगुटी गावातील रहिवासी पंचायत उप-प्रधान भादू शेख यांच्या हत्येनंतर सोमवारी, 21 मार्च रोजी त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ केली होती. त्यांनी अनेक घरांना बाहेरून कुलूप लावून आग लावली. यामुळं 10 जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला होता. यातील 7 जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा - हे आहेत Spider Man; लोकसभेत अरुणाचलचे खासदार नितीन गडकरींबद्दल का बोलले असं? भादू शेख हे सत्ताधारी टीएमसीचे नेते होते वृत्तानुसार, भादू शेख हे राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते होते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भादू शेख हे बरोसालच्या ग्रामपंचायतीचे उपप्रमुख होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वर त्यांचं दुकान आहे. तेथे ते 2 दिवसांपूर्वी बसले असताना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण ते वाचले नाहीत. त्यामुळं त्यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी बागुटी गावात आग लावली. भादू शेख यांच्यावर गावातील काही लोकांनी हल्ला केला असावा, असा संशय त्यांना होता. रामपूर हाट पोलिसांनी सांगितलं की, भादू शेख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.