दिल्ली, 22 मार्च: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (Union Road Transport and Highways Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari was called Spider Man) यांनी रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी सहकारी मंत्री आणि खासदार वेळोवेळी त्यांचं कौतुकही (Appreciation) करत असतात. मात्र, सोमवारी (21 मार्च 2022), देशातील रस्त्यांशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जवळपास सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गडकरींचं कौतुक केलं. भाजपच्या एका खासदारानं तर गडकरींवर स्तुती सुमनांचा वर्षाव करत त्यांचं नामकरणही केलं. अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) भाजप खासदार (BJP MP) तापीर गाओ (Tapir Gao) यांनी लोकसभेत (Lok Sabha) बोलताना नितीन गडकरींना ‘स्पायडरमॅन’ असं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पद्म पुरस्कार घेण्यासाठी आलेले 126 वर्षीय स्वामी शिवानंद PM मोदींसमोर नतमस्तक; मन भारावून टाकणारा VIDEOसोमवारी लोकसभेमध्ये 2022-23 या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये काँग्रेस (Congress) आणि इतर काही विरोधी पक्षांच्या (Opposition Parties) सदस्यांनी रस्ते सुरक्षा आणि प्रतिबंधांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन केलं. तसंच त्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावलं उचलण्याची मागणीही लोकसभेत करण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधील भाजप खासदार तापीर गाओ यांनीदेखील या चर्चेत सहभाग घेतला होता. त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची मनमोकळेपणानं स्तुती केली. गाओंनी नितीन गडकरींचा उल्लेख ‘स्पायडरमॅन’ (Spiderman) असा केला. ज्या पद्धतीनं कोळी जाळं विणतो त्याप्रमाणं गडकरींनी देशांमध्ये रस्त्यांचं जाळं विणलं आहे, असं गाओ म्हणाले. गाओंनी हे कौतुक केलं तेव्हा गडकरी मात्र लोकसभेत उपस्थित नव्हते.
‘मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील रस्ते विकासाच्या कामाला गती मिळाली आहे. गडकरींच्या पाठिंब्यामुळे चीनजवळील सीमेवर रस्त्याचं बांधकाम वेगाने सुरू आहे. मोदी आणि गडकरी यांच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन लाइनवर दोन पदरी रस्ताही निर्माण होत आहे. स्पायडरमॅन इथून पुढेही वेगात रस्ते बांधणीचं काम सुरू ठेवतील अशी मला आशा आहे,’ असं तापीर गाओ म्हणाले. दरम्यान, हा सोमवार लोकसभेसाठी विशेष राहिला. कारण, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान (Question Hour) कोषागार खंडपीठ (Treasury Benches) आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात एकी दिसली. इतर वेळी एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त असलेल्या खासदारांनी विविध मुद्द्यांवर एकत्र येऊन चर्चा केली. केंद्रीय विद्यालयांचा (Kendriya Vidyalayas) मुद्दा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा, खासदारांना विकासकामांमध्ये सहभागी करून घेण्यात जिल्हा प्रशासनाची (District Administration) कुचराई अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्स्फुर्तपणे एकमेकांना पाठिंबा दिला. शिवसेना-भाजपची पुन्हा युती होऊ शकते का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर शिक्षणासंबंधी धोरणं तयार करताना दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रामुख्यानं विचार करावा, अशी विनंती सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याकडे केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लास सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल, काँग्रेसचे खासदार (Congress MP) गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांनी भाजपच्या खासदार (BJP MP) अपराजिता सारंगी (Aparajita Sarangi) यांचं कौतुक केलं.