सावध राहा! सरकार म्हणतं, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती आलेली नाही

सावध राहा! सरकार म्हणतं, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती आलेली नाही

चीन, अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये जसा कोरोनाचा उद्रेक झाला तसा उद्रेक भारतात होईल का याबाबात भीती व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना रुग्णांची सख्या 9 हजारांवर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 308 वर गेली आहे. मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाग्रस्तांची संख्या 9,152वर गेलीय तर गेल्या 24 तासांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 856 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चीन, अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये जसा कोरोनाचा उद्रेक झाला तसा उद्रेक भारतात होईल का याबाबात भीती व्यक्त केली जात होती. मात्र लॉकडाऊन आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मात्र अशाही परिस्थितीत काही सकारात्मक घटना घडत आहेत. देशातल्या 25 राज्यांमधल्या काही जिल्ह्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असून त्यात महाराष्ट्रातल्या गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने जे उपाय केले त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला.

Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, अधिकारी हादरले

चीनमधून ज्या कोरोना किट मागविण्यात आल्या होत्या त्या दोन दिवसांमध्ये भारतात येतील अशी माहिती ICMRचे शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी दिली. आत्तापर्यंत 2,06,212 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात 857 नवे रुग्ण सापडले. मृत्यूची संख्या 308 वर गेली असून 24 तासांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

25 जिल्हयांनी रोखला कोरोना

Coronavirus विरोधातला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवला अशी 25 जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. Covid-19 चा संसर्ग एका रुग्णाकडून कसा अनेकांपर्यंत पोहोचतो आणि होम क्वारंटाइन, लॉकडाऊनचे नियम लादूनही तो किती मोठ्या प्रमाणात देशभर पसरला आहे, याच्या बातम्या येत आहेत. पण त्याबरोबर एक दिलासादायक बातमी आली आहे.

कोरोनाविरुद्ध जिंकला पण समाजाने हरवलं, इंजिनिअरला घ्यावा लागला घर विकायचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात 25 जिल्हे यशस्वी झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला कोरोनारुग्ण सापडले होते. पण त्यांच्यापासून संसर्ग पुढे गेला नाही. तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला. गेल्या 14 दिवसांत या जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये एक महाराष्ट्रातला जिल्हाही आहे.

कोरोनाव्हायरस आता देशातल्या निम्म्या जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. अर्धा भारत या कोरोनाने व्यापला आहे. पण 25 जिल्हे असेही आहेत, की सुरुवातीच्या रुग्णांनंतर गेल्या 2 आठवड्यात तिथे एकही केस सापडलेली नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.

First published: April 13, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या