Home /News /national /

Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं?

Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं?

देशातील 22 राज्यात असलेल्या 44 ठिकाणांवर टाकलेल्या या छाप्यामुळे चिनी कंपन्यांमध्ये घबराट पसरली असून काही संचालक भारतातून पळून गेले आहेत.

    नवी दिल्ली 07 जुलै : दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाख भागात चिनी अतिक्रमण सुरू झाल्यापासून भारताची भूमिका कठोर झाली आहे. आता भारत चीनची कोणतीही चूक माफ करण्याच्या मनस्थितीत नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोबाईल कंपनी Vivo सह अनेक चिनी कंपन्यांवर छापे टाकले (ED Action Against Chinese Companies). देशातील 22 राज्यात असलेल्या 44 ठिकाणांवर टाकलेल्या या छाप्यामुळे चिनी कंपन्यांमध्ये घबराट पसरली असून काही संचालक भारतातून पळून गेले आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रं ताब्यात घेऊन कंपन्यांच्या कामकाजाच्या पद्धतीची कसून चौकशी केली. दिल्लीहून दुबईला निघालेल्या Spicejet च्या फ्लाईटचं पाकिस्तानात लँडिंग; नेमकं काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील Vivo कंपनीच्या सोलन प्लांटमध्ये काम करणारे दोन चिनी संचालक ईडीच्या छाप्यामुळे इतके घाबरले की त्यांनी देश सोडून पळ काढला. ईडीने कंपनी आणि कंपनीच्या संचालकांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अशा स्थितीत कंपनीच्या संचालकांना अटक होण्याची भीती होती. हे पाहून ते गुपचूप आपल्या देशात पळून गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा पैसा चीनला सुनियोजित पद्धतीने पाठवण्याचं रॅकेट अनेक दिवसांपासून सुरू होतं. त्यासाठी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने चिनी नागरिकांना भारतात कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले. त्यानंतर हळूहळू कंपनीचे पैसे बेकायदेशीरपणे बाहेर आणले गेले. तपासाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ईडीच्या तपासात आतापर्यंत 10 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगची माहिती मिळाली आहे. म्हणजेच एवढा पैसा चुकीच्या पद्धतीने देशाबाहेर पाठवण्यात आला आहे. #NEETUGChaloMODIJIAwas: "चलो मोदी आवास"; परीक्षा पुढे ढकलण्यासाठी NEET उमेदवारांचं नवं शस्त्र; # ट्रेडिंग एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तपास सुरू असून आता आणखी बरीच मोठी माहिती समोर येईल. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत असून स्वतंत्र एफआयआर नोंदवला आहे. त्याच वेळी, Vivo कंपनीने एक निवेदन जारी केले आहे की ते या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती पुरवली जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं, “एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही कायद्याचे पालन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: ED, Vivo

    पुढील बातम्या