Home /News /national /

VIDEO: भर रस्त्यात Burning Car चा थरार! सकाळी सर्व्हिसिंग केलेल्या कारनं दुपारी घेतला पेट; काही मिनिटांत होत्याचं नव्हतं

VIDEO: भर रस्त्यात Burning Car चा थरार! सकाळी सर्व्हिसिंग केलेल्या कारनं दुपारी घेतला पेट; काही मिनिटांत होत्याचं नव्हतं

रस्त्यावर पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची आणि काही मिनिटांतच कारचा कोळसा झाल्याची घटना पाहून कारमालकासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

    जयपूर, 6 जुलै : रस्त्यावर पार्क केलेल्या कारने (Car) अचानक पेट घेतल्याची आणि काही मिनिटांतच कारचा कोळसा झाल्याची घटना पाहून कारमालकासह सर्वांनाच आश्चर्याचा (Shocked) धक्का बसला. कारचा मालक (Car Owner) ही कार रस्त्याच्या कडेला पार्क करून काही कामानिमित्त बँकेत (Bank) गेला होता. तो जेव्हा काम संपवून परत आला, तेव्हा कारमधून धूर येत असल्याचं त्याला दिसलं. त्यानं बॉनेट उघडून नेमकं काय झालंय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात कारनं जोरदार पेट घेतला आणि कारमालकाला नाईलाजानं कारपासून दूर जावं लागलं. काही मिनिटांत झाला कोळसा सुरुवातीला कारमधून धूर येत होता. त्यामागे काही तरी किरकोळ कारण असेल, असं समजून कारच्या मालकानं ते ठिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक या कारनं असा काही पेट घेतला की कारमालकाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून दूर जावं लागलं. हा बर्निंग कारचा प्रकार भर रस्त्यात घडत असल्यामुळे तो पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातील काहींनी केलेले VIDEO सोशल मीडियावर VIRAL होत आहेत. कारपासून काही अंतरावर सर्व बाजूंनी नागरिक गोळा झाले. त्यातील काहीजणांनी अग्निशमन दलाला फोन केला. मात्र अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत कारचा अक्षरशः जळून कोळसा झाला होता. अग्निशमन दलानं विझवली आग ही लागल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आग विझली नव्हती, मात्र कारचा जळून कोळसा झाला होता. अग्निशमन दलानं तातडीनं ही आग विझवायला घेतली आणि 15 मिनिटांत जळणाऱ्या कारवर नियंत्रण मिळवलं. मात्र ही कार इतकी जळली होती, ती पूर्णतः निकामी झाली होती. हे वाचा -भारी! हे लेझर डिव्हाईस हवेतच करणार कोविड विषाणूचा खात्मा सकाळीच केलं होतं सर्व्हिंसिंग ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच सकाळी या कारचं सर्व्हिंसिंग करण्यात आलं होतं. सर्व्हिसिंग सेटरमधून ही कार घेऊन त्याच दिवशी कारमालक बँकेत आला होता. मात्र काही कळायच्या आतच या कारनं पेट घेतला. काही तासांपूर्वीच या कारचं सर्व्हिसिंग झालं असल्यामुळे कारमध्ये काही तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरीही शॉर्ट सर्किटमुळे ही कार जळली असावी, असा अंदाज आहे. कार पेटण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Burning car, Rajasthan

    पुढील बातम्या