News18 Lokmat

VIDEO : ओव्हरटेक केलं म्हणून भाजप नेत्याच्या मुलाने कार चालकाला असं मारायचं का ?

राजस्थानच्या एका मंत्र्याच्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 02:20 PM IST

VIDEO : ओव्हरटेक केलं म्हणून भाजप नेत्याच्या मुलाने कार चालकाला असं मारायचं का ?

राजस्थान, 02 जुलै : राजस्थानच्या एका मंत्र्याच्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मारहाणीचा आहे. या मंत्र्याचा मुलगा एक अज्ञात व्यक्तीला कारबाहेर खेचतो आणि त्याला मारहाण करतो.

हा व्हिडिओ बासवाडाचे भाजप विधायक आणि पंचायती राज व ग्रामीण विकास मंत्री धन सिंह रावत यांचा मुलगा 'राजा' याचा आहे. या व्हिडिओ एका नेत्याच्या मुलाची दादागिरी स्पष्टपणे आपण पाहू शकतो.

बुरांडी हत्या प्रकरण : त्या डायरीमध्ये कशा केल्या होत्या मृत्यूच्या नोंदी?

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, आता कारवाई करणार का ?

तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने राजा त्या अज्ञात व्यक्तीला कारच्या बाहेर खेचतो आणि त्याच्या कानशिलात वाजवतो. त्याला वाईट पद्धतीने मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे.

Loading...

यानंतर कार चालकाला तो अमानुषपणे कारच्या बाहेर खेचतो. यात राजा सोबत त्याचे काही साथीदारही आहेत. नीरव उपाध्याय असं या पीडितेच नाव आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ही घटना एक जूनची आहे. पण शनिवारी हा दादागिरीचा व्हिडिओ समोर आला. सध्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहे.

खरंतर ते झालं असं की, पीडित नीरव हा राजाच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याच रागात राजाने नीरवची अशी अमानुष मारहाण केली. सध्या या संपूर्ण प्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेही वाचा...

विनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल

मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 02:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...