मराठी बातम्या /बातम्या /देश /भाजप असा लाडू जो बंगालच्या जनतेला चाखायची इच्छा, प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजप असा लाडू जो बंगालच्या जनतेला चाखायची इच्छा, प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

तृणमूल काँग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Prashant Kishore Audio) नुकतीच व्हायरल झाली आहे. यात ते म्हणाताना दिसत आहेत, की मोदी प्रसिद्ध आहेत.

तृणमूल काँग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Prashant Kishore Audio) नुकतीच व्हायरल झाली आहे. यात ते म्हणाताना दिसत आहेत, की मोदी प्रसिद्ध आहेत.

तृणमूल काँग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Prashant Kishore Audio) नुकतीच व्हायरल झाली आहे. यात ते म्हणाताना दिसत आहेत, की मोदी प्रसिद्ध आहेत.

कोलकाता 10 एप्रिल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यानच (West Bengal Assembly Election 2021) बंगालच्या राजकारणाला वेगळंच वळण देणारी एक घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Prashant Kishore Audio) नुकतीच व्हायरल झाली आहे. यात ते म्हणाताना दिसत आहेत, की मोदी लोकप्रिय आहेत. ममता आणि मोदी दोघंही लोकप्रिय आहेत. या ऑडिओ क्लिपवर प्रशांत किशोर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यांनी असा आग्रहही केला आहे, की भाजपनं संपूर्ण ऑडिओ क्लिप समोर आणावी.

या लीक ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत किशोर म्हणत आहेत, की 'बंगालमध्ये मोदींना माणणारा एक समूह आहे. अनेक लोकांना मोदींमध्ये देव दिसतात. विशेषतः हिंदी भाषिक लोकांचा मोदींना पाठिंबा आहे. मोदी पॉप्युलर आहेत'. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पुढे म्हणाले, 'ममता आणि मोदी प्रसिद्ध आहेत. बंगालनं भाजपचा स्वाद कधी घेतला नाही. लोकांना असं वाटत आहे, की भाजप असं काही करेल जे आपल्याला अजून मिळालं नाही. एक लाडू आहे ज्याचा स्वाद घेण्याची लोकांना इच्छा आहे. त्यामुळे या दिशेनं मोठी संख्या आहे'. कथित ऑडिओ क्लिपबद्दल कोणाताही दावा न्यूज 18 लोकमत करत नाही.

TMC ला आमचा पाठिंबा नाही, ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

प्रशांत किशोर यांनी दिलं स्पष्टीकरण -

हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे, की भाजप माझ्या क्लबहाउस चॅटमधील शब्दांना आपल्या नेत्यांच्या शब्दांपेक्षा अधिक गांभीर्यानं घेते. ते म्हणाले, की प्रसिद्ध करण्यात आलेली ऑडिओ क्लिप आर्धीच आहे. त्यांनी असा आग्रह केला, की भाजपनं पूर्ण ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करावी.

हा ऑडिओ लीक झाल्यानंतर भाजप नेता राजीव बनर्जी म्हणाले, की प्रशांत किशोर यांची रणनिती बंगालमध्ये काम करू शकणार नाही. ते अपयशी ठरले आहेत. हा टीएमसीचा शेवट आहे. आता बंगालमध्ये केवळ नरेंद्र मोदींची रणनिती काम करेल. भाजप नेता लॉकेट चटर्जी म्हणाले, की प्रशांत किशोर यांनाही माहिती आहे, की मोदी सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात सोनार बांगला तयार केला जाणार आहे. मात्र, लोकांना वेडं बनवण्यासाठी ते टीएमसीसोबत जोडले गेले.

First published:

Tags: BJP, Mamata banerjee, Prashant, Viral audio clip, West Bengal Election