Home /News /national /

TMC ला आमचा पाठिंबा नाही, ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

TMC ला आमचा पाठिंबा नाही, ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला पाठिंबा देण्यास किंवा त्यांचा पाठिंबा घेण्यास नकार दिला आहे.

    कोलकाता 10 एप्रिल : पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) चांगलीच चर्चेत आहे. अशात बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला पाठिंबा देण्यास किंवा त्यांचा पाठिंबा घेण्यास नकार दिला आहे. जातीचं राजकारण करून निवडणूक लढवत असल्याचा आरोप ममतांवर करत चौधरी म्हणाले, की दोन्ही पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्या कमी पडली, तर टीएमसी आणि भाजप एकत्र येऊ शकतात. ते पुढे म्हणाले, की ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि जातीय राजकारणाला जागा मिळू लागली. निवडणुकीनंतर टीएमसीला बहुमताची कमतरता असली तरी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यूज एजन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे, निवडणुकीनंतरही टीएमसीसोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नाही. अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न विचारण्यात आला, की काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी टीएमसीला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानं भाजपला मदत होईल का? यावर उत्तर देताना चौधरी म्हणाले, की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला भाजप आणि टीएमसी हातमिळवणी करताना दिसेल. ते म्हणाले, जशी जुन्या वाईनची चव अधिक चांगली लागते, त्याचप्रमाणे जुने मित्र विश्वास ठेवण्यासारखे असतात. टीएमसी आणि भाजप जे याआधी सोबती होते, ते हातमिळवणी करताना दिसतील. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बोलावली काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक काँग्रेससहीत सर्व पक्षांच्या समर्थनासाठी ममता बॅनर्जींनी लिहिलेल्या पत्रावरही अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. ते म्हणाले, ममता बॅनर्जींनी मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बंगालमध्ये ठरवून उद्धवस्त केलं. आमचा पक्ष सत्ते येण्यासाठी त्यांची मदत करत होता. मात्र, आता त्या इतक्या घाबरल्या आहेत की आता काँग्रेसची मदत मागत आहेत. याच काँग्रेसला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mamata banerjee, Trinamool congress, West Bengal Election

    पुढील बातम्या