जाहिरात
मराठी बातम्या / देश / Vikas Dubey Encounter: वडील म्हणाले, बरं झालं ठार मारलं, अंत्यविधीलाही नाही जाणार

Vikas Dubey Encounter: वडील म्हणाले, बरं झालं ठार मारलं, अंत्यविधीलाही नाही जाणार

Vikas Dubey Encounter: वडील म्हणाले, बरं झालं ठार मारलं, अंत्यविधीलाही नाही जाणार

विकास दुबेचं एन्काउंटर बनावट की खरं? यावरून देशात राजकारण सुरू झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 10 जुलै: उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा गॅंगस्टर विकास दुबे (Vikas Dubey)याचा यूपी पोलिसांनी (UP STF) शुक्रवारी सकाळी एन्काउंटर केला. विकास दुबेचं एन्काउंटर बनावट की खरं? यावरून देशात राजकारण सुरू झालं आहे. कारण, पोलिसांनी ज्या प्रकारे विकास दुबे याचा एन्काउंटर केला, त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी युपी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे तर काहींनी पोलिसांची कारवाई पूर्वनियोजित असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा… सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या दुसरीकडे, विकास दुबे याचे वडील रामकुमार दुबे यानी मौन सोडलं आहे. ‘बरं झालं त्याला ठार मारलं, त्याच्या अंत्यविधीलाही जाणार नाही’, असं रामकुमार दुबे यांनी सांगितलं आहे. तर विकास दुबे याची आई सरला देवी यांनी स्वत: घरात बंद करून घेतलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सरला देवी यांची प्रकृती बिघडली असल्याचीही माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी सरला देवी यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, विकास दुबेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्या कानपूरलाही जायला तयार नाहीत. लखनऊमध्येच राहाणे त्यांनी पसंत केलं आहे. सरकारला जे योग्य वाटतं ते करावं, अशी प्रतिक्रिया देखील सरला देवी यांनी गुरुवारी विकास दुबेला अटक झाल्यानंतर दिली होती. नेमकं काय घडलं सकाळी 6.15 वाजता ?  8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला कानपूर येथे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात पोलिसांची गाडी उलटी झाली. त्यात पोलिसांसह विकास दुबे ही देखील जखमी झाला. मध्यभागी बसलेल्या विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात विकास दुबेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताफ्याला सकाळी 6.15 वाजता झालेल्या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? विकास दुबेचा एन्काउंटर झाला की तो पूर्वनियोजित होता, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. काय आहे घटनाक्रम मध्य प्रदेशातील उज्जैन इथे गुरुवारी सकाळी महाकाल मंदिरातून विकास दुबेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैन इथून कानपूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. हेही वाचा… मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला चार्ज, लवकरच निघणार जाहिरात वेगानं घडामोडी घडत असतानाच अचानक शुक्रवारी सकाळी 6.15 च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातादरम्यान गाडी उलटी झाली. या गाडीमध्ये विकास दुबे जीमध्ये मध्यभागी बसला होता. त्यानं बाजूच्या पोलिसाची बंदूक हिसकवून जखमी अवस्थेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी पलटी झालेल्या गाडीतून विकास दुबेला पळताना पाहिलं. पोलिसांनी विकास दुबे याला सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानं ऐकलं नाही. उलट त्यांनं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वबचावासाठी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार मारला गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात