वाराणसी, 14 डिसेंबर: वाराणसीच्या दौऱ्यावर (Varanasi tour) असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) रस्त्यात एका तरुणाच्या कडेवर असणाऱ्या लहान मुलाचं (milk mouthed child) कौडकौतुक केल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या वाराणसी दौऱ्यावर असून तिथल्या विकासकामांचा ते आढावा घेत आहेत. सोमवारी रात्री वाराणसीतील रस्त्यावरून फिरत असताना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. या गर्दीत मोदींना काही महिन्यांचं एक गोड बाळही आल्याचं दिसलं. त्याला त्यांनी जवळ बोलावलं आणि त्याचं कोडकौतुक केलं.
बनारस में कल देर रात को पीएम मोदी का दूधमुंहे बच्चे से प्रश्न: रात को सोते नहीं? pic.twitter.com/eUPLb0IO22
— Akhilesh Sharma (@akhileshsharma1) December 14, 2021
जनतेशी थेट संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वाराणसीत विकासकामांचा आढावा घेत होते. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्याचप्रमाणं पंतप्रधान मोदींच्या विजयाचे नारेदेखील दिले जात होते. या सगळ्या गडबडीत आणि गर्दीत रात्री उशिरा एक बाळाला घेऊन त्याचे वडील रस्त्यावर उभे असल्याचं पंतप्रधान मोदींना दिसलं. त्यांनी बाळाच्य वडिलांना जवळ बोलावलं आणि बाळाच्या गालाला स्पर्श करत त्याचे लाड केले. एवढ्या रात्री बाळ जागं असल्याचं पाहून पंतप्रधानांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी बाळाचे लाड करत त्याला विचारलं, ‘रात को सोते नही हो?’ अर्थात रात्री झोपत नाही का?
वडील झाले भावुक
अर्थात, पंतप्रधानांचा प्रश्न चिमुकल्याला समजण्याचा प्रश्नच नव्हता. ते त्याच्या वडिलांच्या कुशीत खेळत होतं. मात्र पंतप्रधानांनी आपल्या बाळाची दखल घेतली आणि त्याचे लाड केले, याची कृतकृत्यता त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. काही वेळ पंतप्रधान त्या बाळासोबत थांबले आणि मग पुढं निघून गेले.
हे वाचा- वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन कॉफी' Best पर्याय, जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे
कडक सुरक्षाव्यवस्था असताना आणि आजूबाजूला एवढी गर्दी असतानाही पंतप्रधानांनी या बाळाची दखल घेतल्यामुळं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या नागरिकांना आवडत असून सोशल मीडियात तो जोरदार शेअर होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, PM, PM narendra modi, Uttar paredesh, Video viral