भयंकर! डोळ्यादेखत वीज कोसळताना कॅमेऱ्यात कैद, पाहा थरारक VIDEO

भयंकर! डोळ्यादेखत वीज कोसळताना कॅमेऱ्यात कैद, पाहा थरारक VIDEO

गुजरातच्या कच्छ भागात पुढील 24 तासही मुसळधार पावसाचे असणार आहेत

  • Share this:

कच्छ, 08 जुलै : गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांत पावसानं अक्षरश: धुमशान घातलं. वादळी-वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. हवामान विभागाकडून आजही राज्यातील बर्‍याच भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छभोवती कमी दबाव आणि चक्रीवादळ वादळासारखी स्थिती निर्माण झाल्यानं मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसादरम्यान विजांचा कडकडाटही सुरू असताना अचनक वीज कोसळली. कच्छ परिसरात वीज कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. वीज कोसळतानाची ही दृश्यं थरारक असल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे वीज कोसळते आहे.

हे वाचा-चिमुरड्याच्या अंगावरून गेली कार आणि...श्वास रोखून धरायला लावणार VIDEO

हे वाचा-भयंकर! सराव सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

गुजरातच्या कच्छ भागात पुढील 24 तासही मुसळधार पावसाचे असणार आहेत असं हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. सौरराष्ट्र आणि कच्छजवळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यानं वादळी-वाऱ्यासह हा पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 8, 2020, 8:05 AM IST

ताज्या बातम्या